रोहित शर्माची पत्नीवर प्रेमाची बरसात; दिले व्हॅलेंटाईन गिफ्ट

पोर्ट एलिजाबेथ येथील सेंट जॉर्ज मैदानावर शकती खेळी केल्यावर रोहित शर्मा भलताच ट्रेण्डमध्ये आला आहे. प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियाने त्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 14, 2018, 02:03 PM IST
रोहित शर्माची पत्नीवर प्रेमाची बरसात; दिले व्हॅलेंटाईन गिफ्ट title=

नवी दिल्ली : पोर्ट एलिजाबेथ येथील सेंट जॉर्ज मैदानावर शकती खेळी केल्यावर रोहित शर्मा भलताच ट्रेण्डमध्ये आला आहे. प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियाने त्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित केले. दरम्यान, रोहित मात्र आजचा विशेष दिवस साजरा करत आहे. शतकी खेळी आणि व्हॅलेंटाईन डे अशा दुहेरी आनंदात तो रंगून जाताना दिसत आहे. या आनंदात त्याने आपली पत्नी रितिकाला खास गिफ्ट दिले आहे.

पत्नीच्या नावावर थेट गिफ्ट 

आपल्या विजयाचे संपूर्ण श्रेय या 'हिटमॅन'ने पुन्हा एकदा आपल्या पत्नीच्या नावावर केले आहे. रोहितने पाचव्या एकदिवसीय सामन्यात १२६ चेंडूमध्ये शानदार ११५ धावा ठोकून शतकापार खेळी केली. भारताच्या विजयात त्याचा सिंहाचा वाटा ठरल्यामुळे त्याला सामनावीर म्हणून घोषीत करण्यात आले. सामनावीराचे हे गिफ्ट रोहितने जसेच्या तसे पत्नी रितिकाला दिले आहे.

 

Happy Valentine’s Day Rits @ritssajdeh

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

इन्स्टाग्रामवरून पत्नीला खास भेट

रोहितने आपल्या इन्स्टाग्रामवर 'सामनावीरा'ची ट्रॉफी सोबतचे एक छायाचित्र शेअर केले आहे. या छायाचित्रासोबत शर्माने लिहीले आहे. 'हॅप्पी व्हॅलेंटाईन डे रित्स'. रोहित शर्मा आपल्या पत्नीला प्रेमाने रित्स म्हणतो.

 

@rohitsharma45 

A post shared by Ritika Sajdeh (@ritssajdeh) on

दरम्यान, रोहित शर्माच्या शतकी खेळीवर रितिकानेही अत्यंत प्रेमळ आणि तितकीच मजेशीर प्रतिक्रिया इन्स्टाग्रामवर दिली होती.