मुंबई : फळांचा राजा आंबा हा उन्हाळ्यात येणारा सिझनल फल आहे. हा फळ चवीला गोड आणि रसाळ असतो, जो सर्वत लोकांना खायला खूप आवडतो. लहान मुलं असो किंवा मोठी माणसं, आंबा खाण्यापासून कोणीही स्वत:ला रोखू शकत नाहीत. अशी फार कमी लोक असतील की, ज्यांना आंबा आवडत नसावा. आंब्याचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये आंबा कापून किंवा चोखून खाल्ला जातो. चोखून आंबा खाल्याने बऱ्यात लोकांचे हात, तोंड कपडे सर्वंच खराब होतं. ज्यामुळे बहुतांश लोक घरी शांततेत बसून आंबा खाणं पसंत करतात. ज्यामुळे त्यांना तेथे कोणीही जज करणार नाही.
परंतु तुम्हाला माहित आहे का, की आंबा खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे?
असे सांगितले जाते की, आंबे खाण्यापूर्वी १-२ तास ते पाण्यात भिजवून ठेवा, असे तुम्ही अनेकदा वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकले असेल. आता प्रश्न असा उपस्थीत होतो की असं का केलं जातं? आणि भिजवलेले आंबे खाण्यामागचे कारण काय? चला जाणून घेऊ या.
१- आंब्यामध्ये फायटिक ऍसिड नावाचा नैसर्गिक घटक असतो, जो पाण्यात भिजवल्याने निघून जातो. आंबा न भिजवता खाल्ल्यास शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते.
२- आंबा भिजवून खाल्ल्याने त्यातील हानिकारक घटक निघून जातात. अशाप्रकारे आंबा खाल्ल्याने शरीराला कोणतीही हानी होत नाही आणि प्रत्येकजण सहजपणे त्याचे सेवन करू शकतो.
3- आंबा खूप गरम असतो, तो गरम खाल्ल्याने पित्ताचे असंतुलन होते. म्हणूनच असे म्हटले जाते की, आंबा पाण्यात भिजवावा म्हणजे त्याची उष्णता निघून जाईल आणि शरीराला त्यापासून नुकसान होणार नाही.
४- पाण्यात भिजवलेला आंबा खाण्यामागील कारण म्हणजे, आंबा अनेक प्रकारची कीटकनाशके आणि रसायने वापरून पिकवला जातो. याशिवाय आंब्यावर धूळ, घाण आणि मातीही साचू शकते, त्यामुळे पाण्यात ठेवल्याने हे सर्व हानिकारक घटक निघून जातात.
५- आंब्यामध्ये थर्मोजेनिक घटक असतात, जे खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढू लागते. पाण्यात भिजवलेले आंबे खाल्ल्याने हा घटक कमी होतो. आंबा भिजवल्याशिवाय खाल्ल्याने त्वचेच्या समस्या जसे मुरुम, बद्धकोष्ठता आणि डोकेदुखी होऊ शकतात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)