Digestive Biscuits Side Effects in Marathi: सकाळी चहासोबत बिस्किट खाणं सगळेच पसंत करतात. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारांची बिस्किटे उपलब्ध आहेत. आरोग्याच्या बाबतीत दक्ष असलेली लोक अलीकडेच डायजेस्टिव्ह बिस्किटकडे वळले आहेत. या बिस्किटांमुळं वजन वाढत नाही, असं सांगितले जाते. तसंच, आरोग्यासाठी ते फायदेशीर असल्याचेही मानले जाते. मात्र, अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार, डायजेस्टिव्ह बिस्किटांचे वास्तव समोर आले आहे. या बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते पण ते आरोग्यासाठी मात्र फायदेशीर नसते.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट संध्या गुगनानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर बिस्किट्सच्या तुलनेने डायजेस्टिव्ह बिस्किटांमध्ये काही चांगले पदार्थ वापरले जातात. यामध्ये हाय फायबर आणि प्रोटीन असतात. मात्र त्याचे निश्चित प्रमाणात सेवन केल्यास तो एक हेल्दी पर्याय ठरु शकतो. डायजेस्टिव्ह बिस्किटमध्ये साखर, मीठ, अनहेल्दी फॅट, रिफाइंड पीठ वापरले जाते. त्यामुळं यात कॅलरी अधिक प्रमाणात असते. त्यामुळं डायजेस्टिव्ह बिस्किट काय आहे, ते कसे बनवतात व ते कसं खावे याबाबत माहिती जाणून घेऊया.
डायजेस्टिव्ह बिस्किटमध्ये गव्हाचे पीठ, सोडियम बाइकार्बोनेट, अमोनियम बाइकार्बोनेट, मॅलिक अॅसिड आणि टार्टरिक अॅसिड, वनस्पती तेल, दूध पावडर, साखर आणि बेकिंग सोडा यापासून बनवले जाते.
डायजेस्टिव्ह बिस्किटमध्ये एंटासिड गुण (प्रोटियोलिटिक एंजाइम) असतात. कारण बिस्किट सोडियम बायकार्बोनेटसारख्या घटकांचा वापर करून बनवले जातात. अँटासिड गुणधर्म असल्यामुळे अपचन इत्यादीपासून मुक्ती मिळते आणि लवकर पचन होते.
मिळालेल्या माहितीनुसार २ डायजेस्टिव्ह बिस्किटात जवळपास 150 कॅलरी, 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 4.6 ग्रॅम फॅट, 5 ग्रॅम साखर, 2 ग्रॅम प्रथिने, 1 ग्रॅम फायबर आणि 160 मिलीग्राम सोडियम असते. पण वेगवेगळ्या ब्रँड आणि बिस्किटच्या आकारानुसार न्युट्रिशन व्हॅल्यू बदलू शकतात.
डायजेस्टिव्ह बिस्किटमध्ये मीठ अधिक प्रमाणात असते. चार डायजेस्टिव्ह बिस्किटांमध्ये एक पॅकेट बटाट्याच्या वेफर्स इतकं सोडियम असते. तसंच, त्यात ब्लॅक कॅलरी आणि अनहेल्दी फॅट असतात. त्याचबरोबर, यात कोणत्याही प्रकारचे व्हिटॅमिन आणि मिनरल्स आढळत नाहीत. डायजेस्टिव्ह बिस्किटांमध्ये प्रोसेस केले जाते. त्याची मुदत वाढवण्यासाठी त्यात काही प्रिझर्वेटिव्सदेखील मिसळले जातात. यात जवळपास 10 टक्के सेच्युरेटेड फॅट असते जे अनहेल्दी असते.
डायजेस्टिव्ह बिस्किटांमध्ये प्रक्रिया केलेले पीठ, साखर, फॅट, सोडियम असतात. त्याच वेळी, त्यात चव वाढवणारे काही रसायने असतात ज्यामुळे ते तुम्हाला बिस्किट खाण्याचे व्यसन लावू शकतात. जर तुम्हाला खायचेच असेल तर तुम्ही सामान्य बिस्किटांऐवजी डायजेस्टिव्ह बिस्किटे खाऊ शकता. परंतु त्यांचे अतिप्रमाणात सेवन करणे टाळा.
मूठभर ड्रायफ्रुट्स, नाचणीचे बिस्किट, मिश्रित ड्रायफ्रुट्स, मखना, भाजलेले चणे