वजन घटवण्यासाठी प्रोटीन शेक सोडा; 'हे' एकच ड्रिंक करेल तुमची मदत

वजनावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात.

Updated: Jun 15, 2022, 06:35 AM IST
वजन घटवण्यासाठी प्रोटीन शेक सोडा; 'हे' एकच ड्रिंक करेल तुमची मदत title=

मुंबई : वजन वाढणं ही गोष्ट आरोग्यासाठी धोकादायक आहे. कारण यामुळे अनेक आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. यामध्ये औषधं वापरणं, घरगुती उपाय, जिमला जाणे इ. पण तरीही अनेकांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. 

यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे. आहार चांगला ठेवणं, जेवणात जास्त तेल-मसाल्यांचा वापर न करणं, व्यायाम करणं इत्यादी. मात्र तुम्हाला माहितीये का ब्लॅक कॉफीचं तुमचं वजन कमी करण्यास मदत करते. 

ब्लॅक कॉफीच्या सेवनाचे फायदे

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

कॉफीमध्ये एंटी ओबेसिटीसारखे अनेक गुणधर्म आहेत. ज्याचं सेवन आरोग्यासाठी खूप उत्तम असू शकतं. जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. 

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इनफार्मेशनच्या वेबसाईटनुसार, ब्लॅक कॉफी आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. त्यामुळे तुम्ही रोज एक कप ब्लॅक कॉफी तुमच्या पिऊ शकता.

कॅलरी बर्न होते

ब्लॅक कॉफीचं सेवन कॅलरी बर्न करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. ब्लॅक कॉफी मेटाबॉलिक रेट वाढवण्याचं काम करते. ज्याचा थेट परिणाम कॅलरीज कमी होण्यावर होतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात एक कप कॉफी घेऊ शकता.

भूक कमी करण्यासाठी लाभदायक

असं मानलं जातं की, भूक कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीचं सेवन देखील फायदेशीर ठरू शकतं. एका संशोधनातून असं समोर आलंय की, कॉफीमध्ये कॅफेनचं प्रमाण जास्त असल्याने भूक नियंत्रणात राहते. या आधारामुळे तुम्ही रोज ब्लॅक कॉफी घेऊ शकता.