मुंबईत कोरोनामुळे परिस्थिती बिकट; नागरिकांना मास्क लावण्याच्या सूचना

मुंबईत काही जम्बो सेंटर तयार होत असून त्यांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आलं आहे.

Updated: Jun 15, 2022, 06:23 AM IST
मुंबईत कोरोनामुळे परिस्थिती बिकट; नागरिकांना मास्क लावण्याच्या सूचना title=

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय. मुंबई देखील दिवसागणिक रूग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. शिवाय महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या सब-व्हेरिएंटचे 3 रुग्णही आढळून आले आहेत. यानंतर सरकारने लोकांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्यात. 

मुंबईची परिस्थिती पाहता पुन्हा एकदा काही जम्बो सेंटर तयार होत असून त्यांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आलं आहे.

BA.4 आणि BA.5 चे तीनही रुग्णांची तब्येत चांगली

ओमायक्रॉनच्या सब-व्हेरिएंटचे रुग्ण मिळाल्यानंतर सरकार अलर्टवर. दरम्यान, BA.4 आणि BA.5 या सब-व्हेरिएंटचे तिन्ही रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

जंबो सेंटर्स केले एक्टिव्ह

कोविडच्या तिसऱ्या लाटेत मुंबईत जंबो सेंटर्स सुरु आली होती. त्यामुळे आता अशा स्थितीत मुंबईत ज्या वेगाने कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होतेय त्यानंतर मुंबईत उभारलेल्या या जम्बो सेंटर्सना एक्टिव्ह करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 956 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना रुग्णांचा जून महिन्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. तर मुंबईत 1 हजार 724 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तसेच 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.