Home Remedies On Piles : मुळव्याध म्हणजे पाईल्स अतिशय त्रासदायक आजार आहे. ज्यामध्ये खूप त्रास होतो. चुकीची जीवनशैली आणि घाणेरडा आहार या सगळ्याचा परिणाम होऊन मुळव्याधाचा त्रास होतो. 10 पैकी 3 ते 4 लोकांना मुळव्याधाचा त्रास आहे. एवढंच नव्हे तर गरोदर महिलांना देखील मुळव्याधाचा त्रास होतो. पाइल्सचा त्रास हा दोन पद्धतीचा असतो. अंतर्गत मुळव्याध आणि बाहेरील मुळव्याध. बाहेरील मुळव्याधामध्ये पोटात मोठी समस्या निर्माण होते. जसे की बद्धकोष्ठता किंवा गॅस. यामध्ये पोटाचा खूप मोठा त्रास जाणवतो. अशावेळी ऑपरेशन हा एकच पर्याय असल्याचं सांगण्यात येतं.
पण मुळव्याधावर घरगुती ९ उपाय आहेत जे फायदेशीर ठरतात. याचा रोज वापर केला तर मुळव्याधाकरिता ऑपरेशन करण्याची गरज भासत नाही. हे ९ उपाय कोणते जाणून घेऊया.
शारिरीक फिटनेस अत्यंत महत्त्वाचा आहे. व्यायामामुळे तुमचे चलन होत राहते. पचनसंस्था सुधारते आणि गॅस, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. हालचाल असेल तर मलविसर्जन होणे सहज शक्य होते आणि मुळव्याधाचा त्रास कमी होतो.
पोटाशी संबंधित त्रास कमी करण्यासाठी मेथीचे दाणे गुणकारी आहे. एक चमचा मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेऊन सकाळी खावी. यामुळे पोटाचा त्रास आणि पर्यायाने मुळव्याधाचा त्रास कमी होतो.
मुळव्याधाचा त्रास होऊ नये करिता सगळ्यात महत्त्वाच म्हणजे हायड्रेड राहणे. पाण्याची कमतरता असेल तर मुळव्याधाचा त्रास होतो. भरपूर पाणी प्यायल्यावर मल मऊ होते आणि मुळव्याधाचा त्रास कमी होतो.
मुळव्याध सुरूवातीच्या टप्प्यात असेल तर हे उपाय अतिशय गुणकारी ठरतात. एका ग्लासात कोमट दूध १ चमचा गाईचे तूप मिसळून घ्या. रात्री हे दूध प्यायलाने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो.
फायबरयुक्त आहार मुळव्याधावर सर्वोत्तम आराम आहे. सफरचंद, भाज्या, तांदूळ, तृणधान्ये आणि काजूचे सेवन केल्यास मुळव्याधापासून आराम मिळतो.
कोरफड हे आयुर्वेदात महत्त्वाचे मानले जाते. अँटी इम्फ्लामेटकी गुणधर्म आजार आणि जखम बरे करतात. त्यामुळे मुळव्याधावर आराम मिळतो.
पोट आणि पचनाशी संबंधित त्रास असेल तर आवळा गुणकारी ठरतो. मुळव्याधाचा त्रास कमी करण्यासाठी आवळा आवर्जून खा.
नैसर्गिक उपचारात नारळाचे तेल मॉइश्चरायजर म्हणून काम करते. मुळव्याध्यावर आराम मिळावा म्हणून याचा वापर करावा. रुम टेम्प्रेचरमध्ये खोबरेल तेल लावल्यास मुळव्याधाचा त्रास कमी होतो.