दात किडणे, हिरड्यांना सूज येणे बेतेल जीवावर, 75 टक्क्यांपर्यंत वाढते Liver Cancer Risk

Oral Health: दात आणि तोंडाची दररोज स्वच्छता करणे खूप महत्वाचे आहे. तोंडाच्या स्वच्छतेच्या अभावामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका (Liver Cancer risk) वाढू शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे.

Updated: Sep 15, 2022, 02:03 PM IST
दात किडणे, हिरड्यांना सूज येणे बेतेल जीवावर, 75 टक्क्यांपर्यंत वाढते Liver Cancer Risk title=

Oral Health Tips: आरोग्याच्या दृष्टीने दातांची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. आजकाल दात स्वच्छ करण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने आहेत. दातांची स्वच्छता करण्यासोबतच त्यांची रोज काळजी घेतली पाहिजे, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. दात नियमित साफ न केल्यास प्लाक जमा होतो. प्लाक हा एक चिकट थर असतो, जो दातांना चिकटतो आणि हळूहळू दात किडतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की तोंडाच्या स्वच्छतेमुळे यकृताच्या कर्करोगासारखा जीवघेणा (Liver Cancer risk) आजार होऊ शकतो. 

Tea: चहा पिणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या, दिवसात किती घ्यावा!

खराब Oral Health हे यकृताच्या कर्करोगाचे कारण ...

क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट येथे केलेल्या अभ्यासानुसार , किडलेले दात आणि तोडाच्या अस्वच्छेतमुळे यकृताचा कर्करोग (Liver Cancer risk) होऊ शकतो. अभ्यास करणाऱ्या संशोधकांना असे आढळून आले की ज्या लोकांना तोंडाचे आजार जसे की हिरड्यांमधून रक्त येणे, तोंडात व्रण येणे, दात किडणे किंवा आघात होणे यांसारखे आजार होते त्यांना हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमाचा धोका 75 टक्के जास्त असतो. हे यकृताच्या कर्करोगासाठी ते धोकादायक आहे.

संशोधनात झाला मोठा खुलासा

या अभ्यासात ब्रिटनमधील 4.5 लाखांहून अधिक लोकांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या दातांचा आणि तोंडाचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर तोंडाचे आरोग्य आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कर्करोगाच्या जोखमीचे विश्लेषण करण्यात आले. संशोधकांना असे आढळून आले की, संशोधनात सहभागी असलेल्या 4,069 लोकांना 6 वर्षांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कर्करोग झाला. यापैकी 13 टक्के प्रकरणांमध्ये, रुग्णांमध्ये poor oral hygiene आढळून आले.

तज्ज्ञ काय म्हणतात?

तोंडाच्या आरोग्यामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका (Liver Cancer risk) कसा वाढतो हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. यामागे दोन कारणे असू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पहिल्या कर्करोगात तोंडी आणि आतड्याच्या मायक्रोबायोमची भूमिका. दुसरीकडे, ज्यांच्या तोंडाचे  poor oral hygiene आढळून आहे. ते पौष्टिक पदार्थ खाण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे त्यांच्या यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो. यकृताच्या कर्करोगामुळे वजन कमी होणे, कावीळ, वेदना किंवा ओटीपोटात सूज येऊ शकते. तुम्हाला या समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)