प्लास्टिकवर ८ दिवस तर त्वचेवर 'इतके' तास जिवंत रहातो Omicron, संशोधनात आलं समोर

Omicron ने जगभरात हातपाय पसरले आहे, अशात संशोधनातून एक मोठी माहिती समोर आली आहे

Updated: Jan 27, 2022, 09:45 PM IST
प्लास्टिकवर ८ दिवस तर त्वचेवर 'इतके' तास जिवंत रहातो Omicron, संशोधनात आलं समोर title=

Omicron Variant : देशात कोरोनाचं (Corona) संकट अजूनही संपलेलं नाही. दररोज देशात दोन ते अडीच लाख रुग्णसंख्येची नोंद होत आहे. ओमायक्रॉननेही देशात हातपाय पसरले आहे. अशातच संशोधनातून आता एक मोठी माहिती समोर आली आहे.

कोरोना व्हायरसचा (coronavirus) ओमायक्रॉन व्हेरिएंट (omicron) त्वचेवर 21 तास, तर प्लास्टिकच्या पृष्ठभागावर आठ दिवस टिकू शकतो. एका संशोधनात हे समोर आलं आहे. संशोधनात असाही दावा केला जात आहे की यामुळेच या ओमायक्रॉन इतर व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरत आहे.

त्वचेवर २१ तास रहातो जिवंत
जपानमधील क्योटो प्रीफेक्चरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. त्वचेवर विषाणूचे जीवन चक्र शोधण्यासाठी संशोधकांनी शवांवर चाचण्या केल्या आहेत. यात त्वचेवर अल्फा 19.6, बीटा 19.1, गॅमा 11 तास, डेल्टा 16.8 तास, तर ओमायक्रॉन 21.1 तास जिवंत रहात असल्याचं आढळून आलं.

ओमायक्रॉनचा संसर्गजन्य वेग जास्त
संशोधनानुसार, कोरोना विषाणूचे पूर्वीचे व्हेरिएंट अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा मानवी शरीरावर इतके दिवस टिकू शकले नाहीत. संशोधकांचे म्हणणं आहे की ओमायक्रॉनची वातावरणात अधिक स्थिरता आहे. त्यामुळे तो अधिक संसर्गजन्य होऊ शकतो. ओमायक्रॉनच्या वेगवान संसर्ग क्षमतेमुळे जगभरात अधिक रुग्ण आढळून येत आहेत

ओमायक्रॉन प्लास्टिकच्या पृष्ठभागावर 8 दिवस टिकतो
संशोधकांचं म्हणणे आहे की प्लास्टिकच्या पृष्ठभागावर ओमायक्रॉनचा विषाणू दीर्घकाळ जिवंत राहतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की विषाणूचा मूळ स्ट्रेन 56 तास, अल्फा स्ट्रेन 191.3 तास, बीटा 156.6 तास, गॅमा 59.3 तास आणि डेल्टा प्रकार 114 तास प्लास्टिकच्या पृष्ठभागावर जगू शकला. त्याच वेळी ओमायक्रॉन 193.5 तास जिंवत राहू शकतो.