Health Tips : शरीरातील हाडं कमकुवत करतात 'या' 5 गोष्टी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

अनेक पदार्थ हाडांच्या समस्यांसाठी कारणीभूत आहेत. हे पदार्थ कोणते आहेत? जाणून घ्या.

Updated: Jan 27, 2022, 04:14 PM IST
Health Tips : शरीरातील हाडं कमकुवत करतात 'या' 5 गोष्टी,  जाणून घ्या संपूर्ण माहिती title=

मुंबई : बऱ्याच लोकांना शरीरच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. या समस्या बऱ्याचदा वयामुळे येतात. परंतु कमी वयात देखील अनेकांना शारीच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. परंतु यामागील कारणं लोकांना बऱ्याचदा लक्षात येत नाहीत. परंतु अपुऱ्या माहितीमुळे लोकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. हे लक्षात घ्या की, तुम्ही जितके जास्त मीठ खाल तितके तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. मीठ हाडे कमकुवत करण्याचे काम करते. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की जे लोक जास्त मीठ खातात त्यांना हाडाचा त्रास उद्भवू लागतात.

परंतु नुसतं मीठच नाही तर आणखी अनेक पदार्थ हाडांच्या समस्यांसाठी कारणीभूत आहेत. हे पदार्थ कोणते आहेत? जाणून घ्या.

कॅफीन

कॅफीनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हाडांमधून कॅल्शियम कमी होऊ लागते आणि हाडांची ताकद कमी होते. अभ्यास दर्शविते की 100 मिग्रॅ कॅफिन सुमारे 6 मिग्रॅ कॅल्शियम कमी करते.

साखर

जर तुम्ही साखरेपासून बनवलेले पदार्थ किंवा कोणत्याही गोड पदार्थाचे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे तुमचे वजन वाढते, तसेच हाडांवर नकारात्मक परिणाम होतो. जास्त वजन असलेल्या लोकांना सांधेदुखीची समस्या इतरांपेक्षा जास्त असतात.

टोमॅटो, मशरूम, मिरी, पांढरे बटाटे, वांगी या भाज्या आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या असतात, मात्र त्यांच्या अतिसेवनाने हाडांना त्रास होतो. याशिवाय आंबट पदार्थ जास्त खाल्ल्याने हाडे कमजोर होतात.

अल्कोहोल

अतिरिक्त अल्कोहोल आणि सोडा पेये देखील तुमची हाडं कमकुवत करु शकतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो.