New variant of coronavirus : कोरोनाची पुन्हा धोकादायक एन्ट्री; वेगाने पसरतोय नवा व्हेरिएंट

New variant of coronavirus found : गेल्या महिन्यात कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट समोर आला होता. EG.5.1 असा हा व्हेरिएंट असून आता तो देशात वेगाने पसरत असल्याची माहिती आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 5, 2023, 07:26 AM IST
New variant of coronavirus : कोरोनाची पुन्हा धोकादायक एन्ट्री; वेगाने पसरतोय नवा व्हेरिएंट title=

New variant of coronavirus found in Britain : तब्बल 2 वर्ष कोरोनाच्या विळख्यात काढल्यानंतर आता आपल्या सर्वांचं आयुष्य पुर्वपदावर आलं आहे. असं असतानातच पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. ब्रिटनमध्ये गेल्या महिन्यात कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट समोर आला होता. EG.5.1 असा हा व्हेरिएंट असून आता तो देशात वेगाने पसरत असल्याची माहिती आहे. 

इंग्लंडच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे, हा जदल गतीने पसरणारा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे उत्पन्न झाला आहे. त्याचसोबत ब्रिटनची स्वास्थ्य सुरक्षा एजेंसी ( UKHSA ) यांच्या सांगण्यानुसार, EG.5.1 ला ‘एरिस’ हे उपनाव देण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना जगाची झोप उडवणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.

या व्हेरिएंटचा कोणत्या वयातील व्यक्तींना धोका?

UKHSA च्या लसीकरण प्रमुख डॉ मेरी रॅमसे म्हणाल्या, 'आम्ही या आठवड्यातील अहवालांमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहिलं. सर्व वयोगटातील लोक, विशेषत: वृद्ध लोक मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये भरती होतायत. 

या व्हेरिएंटपासून कशी काळजी घ्यावी?

डॉ. मेरी पुढे म्हणाल्या की, "नियमितपणे हात धुतल्यास कोरोना आणि इतर बॅक्टेरिया टाळू शकतो. जर एखाद्या रुग्णाला श्वसनासंबंधीच्या आजाराची लक्षणं असतील तर त्याने इतरांपासून शक्य तितक्या दूर राहावं.

सध्याची परिस्थिती कशी?

यापूर्वीही कोरोनाचे अनेक नवे व्हेरिएंट समोर आले होते. सध्य परिस्थितीत मिळालेला हा व्हेरिएंट फारसा गंभीर नसल्याचं मानलं जातंय. याचं कारण असं की, ब्रिटनमध्ये समोर आलेल्या कोरोनाच्या ताज्या आकडेवारीत या नवीन प्रकारातील रुग्णांची संख्या केवळ 14.6 टक्के आहे. UKHSA च्या 'रेस्पिरेटरी डेटामार्ट सिस्टम' द्वारे नोंदवलेल्या 4,396 नमुन्यांपैकी 5.4 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं.

जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) ने दोन आठवड्यांपूर्वी EG.5.1 व्हेरिएंटचं निरीक्षण करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी WHO चे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, लोक आता लस आणि यापूर्वी झालेल्या कोरोनामुळे अधिक चांगले संरक्षित आहेत. तरीही सर्व देशांनी आपली दक्षता कमी करू नये. आशियातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे 31 जुलै रोजी ते कोविडचे नवीन प्रकार म्हणून वर्गीकृत करण्यात आलंय.