हल्ली प्रत्येकाची जीवनशैली ही बैठी झाली आहे. दिवसभर कामामुळे अनेकजण एकाच खूर्चीत बसून असतात. शारीरिकदृष्ट्या हालचाल फार कमी झालेली असते. हे चित्र आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगले नाही. यामुळे आरोग्यविषयक चिंता, हृदयविकाराचा झटका इत्यादींमध्ये वाढ होत आहे. अशावेळी व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. पण नेमकं किती तास बसावे आणि किती तास चालावे किंवा उभे राहावे, हे कुणालाच कळत नाही. अशात संशोधकांनी याबाबतच फॉर्म्युला सांगितला आहे.
किती तासांची शारीरिक हालचाल महत्त्वाची?
चांगल्या आरोग्यासाठी, एखाद्या व्यक्तीच्या दिनक्रमात चार तासांपेक्षा जास्त शारीरिक हालचालींचा समावेश असावा. ज्यामध्ये हलका व्यायाम, मध्यम किंवा जोराने चालणे याचा समावेश असावा. तसेच किमान आठ तासांची झोप समाविष्ट असावी. हलक्या कमी त्रासाच्या हालचालीमध्ये घरातील काम करण्यापासून ते रात्रीचे जेवण बनवण्यापर्यंत असू शकते. तर मध्यम आणि जोमदार हालचालीमध्ये व्यायामाचा समावेश होतो. जसे की वेगवान चालणे किंवा जिम वर्कआउट याचा देखील समावेश असल्याचे संशोधकांनी सांगितले.
4 तास शारीरिक ऍक्टिविटी
8 तासांची झोप
6 तास बसणे
5 तास उभे राहणे
स्वानबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संघाने, उत्तम आरोग्यासाठी बसणे, झोपणे, उभे राहणे आणि शारीरिकरित्या ऍक्टिव राहणे आवश्यक आहे. तसेच 24 तासांच्या दिवसात 2000 हून अधिक लोकांच्या स्वभावाचे विश्लेषण केले.
डायबेटोलॉजिया जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाचे प्रमुख लेखक ब्रेकनरिज यांनी या संशोधनात लोकांच्या कंबरेचा घेर ते त्यांच्या फास्टिंग ग्लुकोजची देखील नोंद केली होती. उदाहरणार्थ, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे किंवा थोड्या थोड्या वेळाने जागेवरुन उठणे, चालणे, हालचाल करणे हे मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीशी संबंधित आहे.