पुरूषांंमधील केसगळती रोखायला मदत करणार 'हे' नवं औषधं !

केसगळतीचा त्रास असणार्‍यांसाठी आता एक खुषखबर आली आहे. 

Updated: May 14, 2018, 04:22 PM IST
पुरूषांंमधील केसगळती  रोखायला मदत करणार 'हे' नवं औषधं ! title=

 मुंबई : केसगळतीचा त्रास असणार्‍यांसाठी आता एक खुषखबर आली आहे. शास्त्रज्ञांच्या संशोधन अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार आता केसगळती, टक्कलपणा कमी करण्याची नवं औषध सापडलं आहे. यामुळे केसगळतीच्या समस्येमुळे वाढणारा न्यूनगंड कमी होण्यास मदत होणार आहे.  

 काय आहेत उपचार ? 

वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार,  ऑस्टोपोरॉयसिसच्या उपचारांसाठी विकसित करण्यात आलेल्या औषधांच्या मदतीने आता केसगळतीचा त्रासही आटोक्यात ठेवण्यास मदत होणार आहे. वे-316606 या औषधामुळे केसगळतीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. 

'पीएलओएस बायोलॉजी' जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, ऑस्टोपोरॉयसिसच्या औषधांमुळे केसगळतीचा त्रासही आटोक्यात ठेवण्यास मदत होणार आहे. या औषधांमुळे केसांना मजबुती मिळते. 

ब्रिटनच्या मॅनचेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या अभ्यासातून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार, सध्या केवळ ' मिनोक्सिडिल' आणि 'फिनास्टेराईड' या औषधांचा वापर पुरूषांमधील केसगळतीच्या समस्येवर फायदेशीर ठरत आहे.  

 नकारात्मक परिणाम -    

पुरूषांमधील केसगळतीचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी वापरण्यात येणार्‍या औषधांमुळे काही नकारात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे निकाल मिळत नाहीत. अनेकजण यामुळे हेअर ट्रान्सप्लान्ट उपचार पद्धतीचा पर्याय निवडतात.