नवरात्रीत रोज खा 'ही' ४ फळे, दिवसभर राहाल अ‍ॅक्टीव्ह

नवरात्रीचे उपवास करताय, 'ही' फळे खाऊन तुम्हाला दिवसभर अ‍ॅक्टीव्ह राहता येणार 

Updated: Sep 25, 2022, 11:10 PM IST
नवरात्रीत रोज खा 'ही' ४ फळे, दिवसभर राहाल अ‍ॅक्टीव्ह  title=

मुंबई : उद्या 26 सप्टेंबरपासून नवरात्रीचे व्रत सुरू होणार आहे. यानिमित्त अनेक लोक 9 दिवस उपवास करतात. ९ दिवसांच्या दीर्घ उपवासात अनेकांना अशक्तपणा जाणवू लागतो. जर तुम्हाला उपवासाच्या वेळी अशक्तपणा जाणवत असेल तर दिवसभरात दर 2 तासांनी 1 ते 2 फळे खा. यामुळे तुम्हाला शारीरिक कमजोरी वाटणार नाही आणि तुम्ही अॅक्टीव्ह राहाल. त्यामुळे ही फळे कोणती आहेत, ती जाणून घ्या. 

सफरचंद
नवरात्रीनिमित्त सफरचंद खा. सफरचंद खाल्ल्याने तुमच्या शरीराला भरपूर फायबर मिळेल. यासोबतच यामध्ये कार्बोहायड्रेट्स देखील असतात, ज्यामुळे शरीर ऊर्जावान राहते. जर तुम्ही 9 दिवस उपवास करत असाल तर नवरात्रीत सफरचंदाचे सेवन जरूर करा.

ब्लूबेरी
ब्लूबेरीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. याशिवाय त्यात पाणीही मोठ्या प्रमाणात असते. जर तुम्हाला उपवासात उत्साही राहायचे असेल तर तुमच्या आहारात ब्लूबेरीचा समावेश करा. यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल. तसेच, तुम्ही अनेक शारीरिक समस्यांपासून दूर राहाल.

संत्री
संत्री हे व्हिटॅमिन सी चा खूप चांगला स्त्रोत आहे, ज्याचे सेवन करून तुम्ही शरीर तंदुरुस्त ठेवू शकता. याशिवाय संत्र्यामध्ये पाणी आणि फायबर देखील असतात जे तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात. नवरात्रीत उपवास करत असाल तर संत्री नक्की खा.

मनुका
मनुका खाल्ल्याने तुमचे शरीर हायड्रेटेड राहते. यासोबतच तुमच्या शरीराला भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स मिळतात, ज्यामुळे तुम्हाला शारीरिक कमजोरी जाणवत नाही. उपवासात शरीर निरोगी ठेवायचे असेल तर मनुका खा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)