या '४' नैसर्गिक उपायांनी मिळवा जखमेच्या खुणांपासून सुटका!

लहानपणी काही लागल्याच्या, जखमेच्या खुणा आजही शरीरावर असतील.

Updated: Jun 23, 2018, 10:26 AM IST
या '४' नैसर्गिक उपायांनी मिळवा जखमेच्या खुणांपासून सुटका! title=

मुंबई : लहानपणी पडल्यामुळे किंवा मस्ती करताना लागले नाही असे खूप कमी लोक असतील. लहानपणी काही लागल्याच्या, जखमेच्या खूणा आजही शरीरावर असतील. या खूणा घालवण्यासाठी लेझर ट्रिटमेंट, सर्जरीचा उपायही आहे. पण या खर्चिक ट्रिटमेंटपेक्षा या घरगुती उपायांनी देखील जखमेच्या खूणा, निशाण दूर होतील. जाणून घेऊया हे घरगुती उपाय...

लिंबू

लिंबू सर्वात उत्तम नैसर्गिक ब्लिचींग अजेंट आहे. लिंबाचा वापर जखमेचे निशाण दूर  करण्यासाठी करता येईल. त्याचबरोबर मृत त्वचाही दूर होईल. या खूणा दूर करण्यासाठी लिंबाच्या रसात कापसाचा गोळा भिजवून त्यावर लावा. एक आठवडा नियमित हा प्रयोग करा. 

मध

मध त्वचा मॉश्चराईज करण्याचे काम करते. जमखेच्या खूणा म्हणजे डेड स्किन सेल्स आणि टिशूज असतात. मधामुळे नवीन त्वचेच्या टिशूचा विकास होऊन खूणा कमी होतील. यासाठी मध नियमित या खूणांवर लावा. उत्तम परिणामांसाठी मधात लिंबाचा रस घालून लावा. 

काकडी

काकडी अगदी सहज उपलब्ध होते. आरोग्याबरोबच त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी काकडी अत्यंत फायदेशीर ठरते. काकडीमुळे त्वचा मुलायम आणि हायड्रेट होते. जखमेच्या खूणा दूर करण्यासाठी काकडीची पेस्ट करुन त्यावर लावा. 

चंदन पावडर

चेहऱ्यावरील जखमेच्या, लागल्याच्या खूणा दूर करण्यासाठी चंदन पावडर हा एक उत्तम पर्याय आहे. जखम ठीक करण्याची नैसर्गिक क्षमता चंदन पावडरमध्ये असते. यासाठी चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी आणि दोन चमचे दूध घालून घट्टसर पेस्ट बनवा. जखमेच्या खूणांवर लावा. तासभर सुकू द्या. सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा.