आईचं दूध बाळासाठी संक्रमण काळात असं बनलंय ढाल

याकडे दुर्लक्ष करु नका !

Updated: Aug 5, 2020, 02:41 PM IST
आईचं दूध बाळासाठी संक्रमण काळात असं बनलंय ढाल title=

मुंबई : राष्ट्रीय माता बाल संगोपन कार्यक्रमाअंतर्गत व युनिसेफ या बाळांसाठी कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेतर्फे दरवर्षी १ ते ७ ऑगस्टदरम्यान आरोग्य विभागामार्फत महिलांसाठी स्तनपान जनजागृती सप्ताह राबविण्यात येतो. आजकालच्या सुशिक्षित व उच्चभ्रू शहरी भागातील मातांच्या मनात नवजात शिशुला स्तनपान देताना खूप गैरसमज असतात. परंतू स्तनपान दिल्याने बाळाला खुप फायदा होतो. आईचे दूध प्यायल्याने बाळाला यातून रोगप्रतिकारक शक्ती मिळते. 

कोरोना सारख्या विषाणुशी लढण्यासाठी उत्तम रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे अतिशय गरजेचे आहे हे सर्वांनाच माहिती आहे. लहान बाळाला ही रोगप्रतिकारक शक्ती मिळविण्यासाठी आईचे दुध पाजणे गरजेचे आहे. आईचे दूध बाळांना सर्व प्रकारच्या संक्रमणापासून वाचवते. कोरोना संक्रमणापासून आपल्या बाळाला दूर ठेवण्यासाठी तसेच या काळात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी स्तनपान करणे गरजेचे आहे.

आईच्या दूधात असलेले लोक्टोफोर्मिन तत्व हे आईच्या स्तनापर्यंत थोरॉसिक डक्ट नळीतून पोहोचते. बाळाच्या नाक आणि घश्याच्या भागात यामुळे रोगप्रतिरोधी त्वचा तयार करते. आईचे दूध आहारातील उत्तम स्त्रोत आहे ज्यामध्ये प्रथिने, चरबी, लोह, जीवनसत्त्वे यासारख्या सर्व प्रकारच्या पौष्टिक मूल्यांचा समावेश असतो. 

आईचे दूध बाळाला अतिसार, श्वसन संसर्गासारख्या आजारांपासून वाचवते मुलांना दमा, एलर्जी आणि मधुमेह यासारख्या आजारांपेक्षा जास्त प्रतिरोधक असतात स्तनपानामध्ये पुरेसे लोह असल्याने, स्तनपान देणा बाळाला अशक्तपणा येत नाही. पहिले सहा महिने आईचे दुध हे बाळासाठी संपुर्ण पोषण असते. ६ महिन्यांहून अधिक वयोगटातील बाळाकरिता आईच्या दुधासह योग्य घन पदार्थ मिळायला हवे. 

अशी शिफारस केली जाते की आपल्या बाळासाठी स्तनपान कमीतकमी वयाच्या २ वर्षापर्यंत चालू ठेवावे. डॉ तुषार पारेख, कन्‍सल्‍टंट निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोग तज्ञ, मदरहुड हॉस्पीटल, पुणे  सांगतात की शारीरिक वाढ आणि मेंदूच्या विकासासह स्तनपानाने बाळाची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात खूप महत्वाची भूमिका निभावली जाते. आईच्या दुधात इम्युनोग्लोब्युलिन (प्रथिने जे संक्रमणास विरोध करतात), पांढ-या रक्त पेशी आणि इतर अनेक प्रतिकारशक्ती वाढवितात.

मदरहुड हॉस्पीटल, खारघर येथील बालरोग व नवजात शिशु तज्ञ, डॉ. सुरेश बिराजदार सांगतात स्तनपान देणाया मातेने आपल्या आहारात फ्लॅक्ससीड्स, दही, अंडी, ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करावा. प्रथिने तसेच पुरेसे जीवनसत्व, कॅल्शियम, व्हिटामिन डी, लोह, फोलिक एसिड हे महत्वाचे जीवनसत्त्वे आणि खनिजांचा आहारात समावेश असावा तसेच धूम्रपान आणि मद्यपान टाळा.

बाळाची रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यासाठी स्तनपान कसे आवश्यक आहे ते जाणून घ्या

स्तनपान हे बाळाला आजारांशी लढण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करते. या एन्टीबॉडीज बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीस सूक्ष्मजंतूपासून बचाव करण्यासाठी चालना देतात. आणि आजारांपासून दूर ठेवण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावितात.

आईच्या दुधात इम्युनोग्लोबीन ए असते. जे बाळाला विविध संर्गापासून दूर ठेवण्यास मदत करते.

शिवाय, स्तनपान केल्याने आपल्या बाळाला कानाचे संसर्ग, न्यूमोनिया आणि मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्ग होण्याची शक्यता देखील कमी होते.

आईचे दूध हे बाळाला रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते. प्रथिने, चरबी, शर्करा असे संपुर्ण पोषण हे आईच्या दुधातून मिळते.

स्तनपानामुळे मुलांच्या मेंदूचा व विकास वेळीच झाल्यामुळे बौद्धिक क्षमता हि उंचावते म्हणून स्तनपानाचा अर्भकाच्या विकासातील सर्वोत्तम दुवा मानला जातो.

फॉर्म्युला मिल्कपेक्षा आईचे दुध हे बाळाच्या वाढीकरिता सर्वोत्तम ठरते. बाळाला पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपान करवणं सर्वोत्तम कारण त्यामुळं पचनाशी निगडीत समस्यांपासून संरक्षण मिळतं तसेच आईचे दूध पचायला सोपं असतं आणि बध्दकोष्ठता होत नाही.  त्यामुळं बाळाच्या आतड्यांची प्रतिकारशक्ती वाढते.