भारतात आढळला मंकीपॉक्सच्या घातक Clade 1b चा पहिला रुग्ण भारतात एन्ट्री; पुन्हा कोरोनासारखीच स्थिती?

Mpox Clade 1b: मंकीपॉक्सच्या घातक स्ट्रेनचा रुग्ण आढळल्यामुळं भारतात खळबळ. जाणून घ्या काय आहे नेमकी परिस्थिती... पाहा सविस्तर वृत्त.   

सायली पाटील | Updated: Sep 24, 2024, 07:35 AM IST
भारतात आढळला मंकीपॉक्सच्या घातक Clade 1b चा पहिला रुग्ण भारतात एन्ट्री; पुन्हा कोरोनासारखीच स्थिती? title=
Mpox Clade 1b who alerts on first case reported latest update health news

Mpox Clade 1b: जागतिक स्तरावर अतिशय धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या मंकीपॉक्सच्या क्लॅड 1 स्ट्रेनचा पहिला रुग्ण सापडला असून, आता आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलेल्या अतिधोकादायक स्ट्रेनचा रग्ण केरळच्या मलप्पुरम इथं आढळला असून, रुग्णाचं वय 38 वर्षे असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा रुग्ण हल्लीच संयुक्त अरब अमिराती इथून परतला होता.

घातक विषाणूजन्य संसर्गाची बाधा झाली असली तरीही केरळमधील या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात येत आहे. 

काह आहे हा एमपॉक्स संसर्ग? 

एमपॉक्स हा एक व्हायरल जुनोटिक आजार असून, त्याचा प्रादुर्भाव संक्रमित जखम, कपडे किंवा तत्सम गोष्टींच्या संपर्कात आल्यामुळं फोफावतो. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनंही हा प्रादुर्भाव (PHEIC) म्हणजेच आरोग्य आणिबाणी म्हणून घोषित करण्यात आल्यामुळं यंत्रणा त्याबाबत सतर्कता बाळगताना दिसत आहेत. 

2022 मध्ये पहिल्यांदाच या संसर्गामुळं रुग्णसंख्या वाढत असल्याची बाब लक्षात आली असून 2024 मध्येही रुग्णसंख्या वाढत असल्यामुळं जागतिक स्तरावर सदर बाबतीत अतिदक्षता बाळगली जात असल्याचं चित्र आहे. 

काय आहेत लक्षणं आणि कसा करावा बचाव? 

14 दिवसांच्या कालावधीत मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याची बाब निदर्शनास येते. ज्यामध्ये प्राथमिक स्वरुपात सर्दी, ताप, थकवा, घशाला सूज अशा लक्षणांचा समावेश आहे. सुरुवातीला ही लक्षणं एक ते चार दिवसांपर्यंत कायम राहतात. सुरुवातीला या संसर्गामुळं शरीरावर येणाऱ्या व्रणांना कांजिण्या समजतात. पण, लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे एमपॉक्सचे पुरळ चेहरा, हात पाय आणि छातीवर दिसू लागतात. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : अलर्ट! आज राज्यात मुसळधार; वादळी वाऱ्यांचा वेग पाहून भरेल धडकी  

 

संसर्गापासून बचाव करायचा झाल्यास सतर्कता बाळगणं अतिशय महत्त्वाचं असून प्रामुख्यानं तो त्वचेच्या संसर्गापासून फैलावतो. ज्यामुळं एमपॉक्सचा प्रादुर्भाव असणाऱ्या व्यक्तीच्या थेट संपर्कात न येण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणा देतात. इतकंच नव्हे तर संसर्ग झालेल्या व्यक्तीवर तातडीनं उपचार करण्याचा सल्ला आरोग्य यंत्रणा देतात. प्राथमिक स्वरुपात या संसर्गापासून बचावासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.