डेंग्यू-मलेरियाच्या मच्छरांना छुमंतर करतील 'ही' झाडं

पावसाळ्याच्या दिवस म्हणजे आजाराला निमंत्रण असतं.

Updated: Aug 31, 2021, 09:12 AM IST
डेंग्यू-मलेरियाच्या मच्छरांना छुमंतर करतील 'ही' झाडं title=

मुंबई : पावसाळ्याच्या दिवस म्हणजे आजाराला निमंत्रण असतं. या दिवसांमध्ये डेंग्यू आणि मलेरिया हे आजार डोकं वर काढतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घराजवळ डासांची पैदास होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर आज आम्ही तुम्हाला अशा झाडांबद्दल सांगणार आहोत जी मच्छरांना दूर ठेवण्याचंही काम करतात. 

सिट्रोनेला ग्रास

सिट्रोनेला ग्रास मच्छरांना दूर ठेवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या ग्रासमधून निघणारं सिट्रोनेला हे मेणबत्ती, फरफ्यूम, लॅम्स तसंच हर्बल प्रोडक्स्टमध्ये वापर केला जातो. 

झेंडूची फूल

पिवळ्या झेंडूची फुलं तुमच्या बाल्कनीचे सौंदर्य तर वाढवतातच पण माशांना तसंच डासांना सुगंधामुळे घरापासून दूर ठेवतात. हे फार कमी लोकांना माहित आहे. आफ्रीकन आणि फ्रेंच ही झेंडूच्या वनस्पतीचे दोन प्रकार आहेत. या दोन्ही वनस्पती मॉस्किटो रिप्लीयन्ट आहेत. झेंडूची फुले पिवळ्या ते गडद केशरी आणि लाल रंगाची असू शकतात.

तुळस

ज्या तुळशीच्या रोपाची तुम्ही दररोज घरात पूजा करता ते डास दूर करण्याचं कामंही करतं. आपल्या आरोग्यापासून डासांना दूर नेण्यापर्यंत तुळशी खूप फायदेशीर आहे. डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी तुळशीचे रोप घराबाहेर किंवा खिडकीत लावा.

लेवेंडर

लेव्हेंडर वनस्पती डासांचा शत्रू मानलं जातं. बाजारात मिळणारे मॉस्किटो रिप्लीयन्ट त्वचा आणि आरोग्यास हानी पोहोचवतात. परंतु डासांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी या वनस्पतीचा वापर हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. मॉस्किटो सोल्युशन तयार करण्यासाठी, लॅव्हेंडर तेल पाण्यात मिसळून ते त्वचेवर लावावं.

रोजमेरी 

रोझमेरी फुलाचा रंग निळा असतो. झेंडू आणि लेवेंडर वनस्पतींसारखे, हे देखील एक नैसर्गिक मॉस्किटो रिप्लीयन्ट आहे. डासांपासून दूर राहण्यासाठी, रोझमेरी मॉस्किटो रिप्लीयन्टचे 4 थेंब 1 चतुर्थांश ऑलिव्ह ऑइलसोबत मिक्स करून त्वचेवर लावा.