आता तुमचा श्वासंच करणार कोरोनाचा खात्मा?

कोरोना लसी इंजेक्शनद्वारे देण्यात येत होत्या. तर आता ही नवी लस नाकावाटे देण्यात येणार आहे. 

Updated: Feb 16, 2022, 10:13 AM IST
आता तुमचा श्वासंच करणार कोरोनाचा खात्मा? title=

मुंबई : कोरोनासंदर्भात दर दिवशी वेगवेगळे अभ्यास होतायत. अशातच आता शास्त्रज्ज्ञांनी एक नवी कोरोनाची लस तयार केली आहे. यापूर्वीच्या कोरोना लसी इंजेक्शनद्वारे देण्यात येत होत्या. तर आता ही नवी लस नाकावाटे देण्यात येणार आहे. 

जर्नल सेलमध्ये पब्लिश करण्यात आला स्टडी

जर्नल सेलमध्ये पब्लिश करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, मैकमास्टर यूनिवर्सिटीच्या तज्ज्ञांनी श्वासावाटे म्हणजेच नाकावाटे देण्यात येणारी इनहेल्ड वैक्सीन (Inhaled vaccine) तयार केली आहे. 

तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, ही लस श्वासावाटे म्हणजेच नाकावाटे घेतली जाऊ शकते. त्यामुळे याला  एरोसॉल वैक्‍सीन (Aerosol vaccine) असं म्हटलं जातं. ही लस थेट फुफ्फुस आणि श्वासाच्या नलीकेला टार्गेट करते. त्यामुळे ही फार प्रभावी लस आहे.

ही लस कोरोनाच्या बदलत्या व्हेरिएंटवरही प्रभावी ठरू शकते, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. शिवाय या लसीमुळे खास पद्धतीची इम्यूनिटी डेव्हलप होत असून ती कोरोनाविरूद्ध उपयुक्त असल्याचं दावा शास्त्रज्ज्ञांनी केला आहे.

इनहेल्ड वॅक्सिनमध्ये औषधाच्या कमी डोसची गरज भासते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये सध्या असलेल्या इंजेक्शनच्या लसीच्या तुलनेत केवळ 1 टक्का औषध पुरेसं आहे.