आंब्याच्या बाटीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं? जाणून घ्या काय आहे सत्य

आंब्याची बाट तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Updated: May 1, 2022, 12:29 PM IST
आंब्याच्या बाटीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं? जाणून घ्या काय आहे सत्य title=

मुंबई : कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय का? पण काही केल्या कमी होत नाहीये? यासाठीच आम्ही तुम्हाला एक चांगली कल्पना देणार आहोत. तुम्ही आंबा खाल्ल्यानंतर त्याची बाट फेकून देता का, असं अजिबात करू नका. आंब्याची बाट तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. आंब्याचे सेवन करून तुम्ही शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. याशिवाय यातून अनेक मोठे फायदेही मिळतात. 

पोटासाठी फायदेशीर आंब्याची बाट

फक्त आंबाच नाही तर त्याची बाट देखील तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही आंब्याच्या कोयीचं सेवन केलं तर तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास देखील मदत मिळेल. याशिवाय पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीही हे फायदेशीर आहेत.

ब्लड शुगर नियंत्रणात राहील

डायबेटीज रूग्णांनीही आंब्याच्या कोयीचं सेवन केलं पाहिजे. यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. याचाच अर्थ आंब्याची बाट ही मधुमेही रूग्णांसाठी फायदेशीर आहे.

आंबे खाण्याचे फायदे

  • आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. उन्हाळ्यात आंबा खाणे फायदेशीर ठरते.
  • आंब्यात शर्करा असल्याने आंब्यापासून शरीरास ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्हाला अॅक्टीव्ह वाटते. उन्हाळ्यात आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणे अधिक फायदेशीर ठरेल.
  • आंब्यात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर चेहऱ्यावरची चमक वाढते आणि सुरकुत्या कमी होतात. आंब्यात फायबर्सही मुबलक असतात.