Mango leaves Benefits: आंब्याच्या पानांचे आश्चर्यकारक फायदे, ब्लड शुगर राहिल नियंत्रित

Mango leaves Benefits:  तुम्हाला ब्लड शुगर आहे का? आंब्याच्या पानाचे सेवन करुन तुम्ही तुमची शुगर नियंत्रणात आणू शकता.  

Updated: Jul 12, 2022, 01:18 PM IST
Mango leaves Benefits: आंब्याच्या पानांचे आश्चर्यकारक फायदे, ब्लड शुगर राहिल नियंत्रित   title=

मुंबई : Mango leaves Benefits: आरोग्याच्या दृष्टीने ही बातमी फायद्याची. तुम्हाला ब्लड शुगर आहे का? आंब्याच्या पानाचे सेवन करुन तुम्ही तुमची शुगर नियंत्रणात आणू शकता. आंब्याच्या पानांचे आश्चर्यकारक फायदे पाहून तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, रक्तातील साखरही नियंत्रित राहण्यास मदत होते. 

आंब्याच्या पानांमध्ये  पेक्टिन, व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळतात, जे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. म्हणजेच ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आहे ते देखील याचे सेवन करु शकतात. त्याचबरोबर ज्यांना वजन कमी करायचे आहे ते देखील हे करुन पाहू शकतात. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. ज्यांची दृष्टी कमी आहे ते देखील आंब्याच्या पानांचे सेवन करु शकतात. याच्या सेवनाने दृष्टी चांगली मदत होते. इतके सगळे फायदे हे आंब्याच्या पानांचे सेवन केल्याने होतात.

मधुमेही रुग्णांसाठी महत्वाचे

उन्हाळ्यात प्रत्येकाने आंबा खायला असेलच, पण तुम्हाला माहित आहे का की त्याची पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की हे कसे शक्य आहे. चला तर मग जाणून घेण्याचा प्रयत्न करुया रक्तातील साखर नियंत्रणात या फळाच्या पानांचा वापर कसा करायचा. तथापि, गंभीर रुग्णांनी ते घेण्यापूर्वी एकदा त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आंब्याची पानांचा वापर कसा करावा

सर्वप्रथम, रुग्णांना 10-15 आंब्याची पाने घ्यावी लागतात, नंतर ती पाण्यात व्यवस्थित उकळून घ्या. रात्रभर त्यांना तसेच ठेवा. हे पाणी सकाळी गाळून सेवन करा. लक्षात ठेवा की ते रिकाम्या पोटी प्या. असे नियमित केल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हे उपाय करण्यापूर्वी, वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)