मुंबई : आपली जीवनशैली धावपळीची आहे. त्यामुळे आपल्याला फार केसांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या ब्रॅण्डचे हेअर ऑईल केसांची निगा राखण्यासाठी घेतो. कधीकधी घरगुती उपाय देखील आपण केसांची निगा राखण्यासाठी करतो.
केसांना योग्य पोषण मिळावे म्हणून आपण अनेक प्रकारची हेअर ऑइल वापरतो. बाजारात अनेक प्रकारची तेले उपलब्ध आहेत. प्रत्येक तेल तुमच्या केसासाठी फायदेशीर ठरू शकत नाही. याबाबत जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. काही तेल असे आहेत जे आपल्या केसांचं नुकसानही करू शकतात, जाणून घेऊया याबद्दल.
1.Mineral Oil - काही जण मिनरल ऑईल आपल्या केसांना लावतात. ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. त्यामध्ये पेट्रोलियम आणि पॅराफिन मेण वापरलेलं असतं. यामुळे केस गळण्याची शक्यता असते. केसाच्या मुळांनाही हानी पोहोचते.
2. कापूर तेल- कापूर हे केसांसाठी फायदेशीर असलं, तरीसुद्धा अति वापर किंवा दरवेळी लावणं हानीकरक ठरू शकतं. त्याचे दुष्परिणाम देखील तेवढेच आहेत. केसांना कापूर तेलाने मसाज केल्यास डोक्याची त्वचा निर्जीव होऊ लागते आणि त्याचबरोबर कोंडा वाढण्याचा धोका असतो. पुरळ आणि पिंपल्स डोक्यात होतात .
3. ऑलिव्ह ऑइल- ऑलिव्ह ऑइल केसांसाठी खूप चांगले मानले जाते, परंतु ज्यांना पिंपल्सची समस्या आहे त्यांनी चुकूनही हे केसांना लावू नये. केस जास्त राठ होऊ शकतात डोक्यावर पिंपल्सची समस्या निर्माण होऊ शकते. या तेलामध्ये ऑल्युरोपीन नावाचे संयुग आढळते, ज्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतो. ऑलिव्ह ऑईलचा जास्त वापर केल्याने अनेक वेळा केसांची छिद्रे अडकू लागतात.
4. लिंबू तेल- अनेकजण केसांच्या तेलात लिंबाचा रस मिसळून वापरतात. लिंबू आणि तेल एकत्र करून डोक्याला लावणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे ते पातळ आणि निर्जीव होऊ शकतात. ज्यांचे केस आधीच कोरडे आहेत त्यांनी लिंबू किंवा लिंबू तेल वापरू नये.