नर्सला अजून हसू आवरत नसेल, लस न घेण्यासाठी एकाने जुगाडच तसा केला

इंजेक्शनच्या भितीपासून वाचण्यासाठी या माणसाच्या जुगाडामुळे जगभरातील लोक हैराण झाले

Updated: Dec 5, 2021, 02:04 PM IST
नर्सला अजून हसू आवरत नसेल, लस न घेण्यासाठी एकाने जुगाडच तसा केला title=

इटली : या जगात जुगाड करणाऱ्यांची काही कमतरता नाही, पण काही लोकं असा जुगाड करतात. मात्र असं करणं काही वेळा हानिकारक ठरू शकतं. असंच एक प्रकरण इटलीतून समोर आलं आहे. या ठिकाणी एका व्यक्तीला इंजेक्शनची खूप भीती वाटत होती. यानंतर त्यांनी कोरोनाची लस टाळण्यासाठी असा जुगाड केला, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले.

जुगाड पाहून जगभरातील लोकांना आश्चर्यचकित

इंजेक्शनच्या भितीपासून वाचण्यासाठी या माणसाच्या जुगाडामुळे जगभरातील लोक हैराण झाले असतानाच हॉस्पिटलच्या नर्सने त्याची ही करामत पकडली. ही व्यक्ती इंजेक्शनची भिती टाळण्यासाठी नकली हात लावून कोरोनाची लस घेण्यासाठी पोहोचला.

हा 50 वर्षीय व्यक्ती इंजेक्शनला खूप घाबरत होता आणि तो कोरोना लसीचा विरोध देखील करत होता. मात्र, त्याला काही कामासाठी लसीकरणाचं प्रमाणपत्र हवं होतं. यानंतर या व्यक्तीने ही अजब युक्ती काढली, जे पाहून संपूर्ण रुग्णालयातील कर्मचारी चक्रावून गेले. जगात कोणीही विचार केला नसेल की, लस टाळण्यासाठी एखादी व्यक्ती बनावट हाताने लावून पोहोचेल.

द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, बिएला नावाच्या व्यक्तीला कोरोना लसीच्या सर्टिफिकेटची गरज होती. त्यासाठी तो वॅक्सिनेशन सेंटरमध्ये पोहोचला. त्याने लस घेण्यासाठी आधी नर्ससमोर हात पुढे केला. मात्र नर्सला त्याच्याबद्दल थोडासा संशय आला, कारण त्याच्या हाताची त्वचा खूप मऊ दिसत होती.

यानंतर नर्सने त्याला पूर्ण हात दाखवण्यास सांगितले. यावर त्या व्यक्तीने संकोच सुरू केला आणि त्याच हातावर लस लावण्याचा आग्रह धरला.

नकली हात लावला होता

त्या व्यक्तीच्या या कृत्यावर नर्सने लस देण्यास नकार देत त्याला पूर्ण हात दाखवण्यास सांगितला. त्या व्यक्तीने हात दाखवताच नर्ससह संपूर्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. बिएलाने तिच्या हातावर सिलिकॉनचा बनावट हात लावला होता. नर्सला त्याची कृती कळताच त्याने नर्सला लाच देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्या व्यक्तीचे हा प्रयत्नही फसला आणि तो पकडला गेला.