मुंबई : महिला असो वा पुरूष, लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात मोठा बदल होतो. खासकरून महिलांच्या आयुष्यात मोठा बदल होतो. सासरी गेल्यानंतर महिलांमध्ये खूप मोठे बगल होतात. महिलांमध्ये कमी वयातच भरपूर जबाबदाऱ्या पडतात. लग्नानंतर महिलांच्या व्यक्तीमत्वातही बदल होतो. हे बदल काही काळापुरता असतात असे नाही. कायमच महिला वेगवेगळ्या बदलातून जात असतात.
लग्नानंतर महिलांमध्ये शारीरिक बदल होत असतात. महिला लग्नानंतर स्वतःच्या आरोग्याची अजिबात काळजी घेत नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरात मोठे बगल होता.
अनेक महिला घर आणि ऑफिसमधील काम असं सांभाळून संसार करत असतात. अशावेळी कळत नकळत शरीराकडे दुर्लक्ष होतं.
तसेच महिला स्वतःच्या सौंदर्याला देखील प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे तो अतिशय बदललेल्या दिसतात.
लग्नानंतर अनेक महिला आपल्या पेहराव्यात बदल करतात. अनेक मुली लग्नापूर्वी जीन्स आणि टीशर्ट घालायच्या. पण लग्नानंतर त्या सलवार, पंजाबी सूटमध्ये दिसतात.
लग्नानंतर मुलींनी साडी नेसावी असी आपली संस्कृती आहे. त्यामुळे कळत नकळत त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते.
महिलांना लग्नानंतर सासू-सासऱ्यांसमोर तोकडे कपडे घालणं शक्य नसतं. अशावेळी मनाविरूद्ध या महिला कपडे घालतात. ज्यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वात चांगला, सकारात्मक बदल होत नाही.
महिला लग्नानंतर स्वतःसाठी वेळ काढत नाही. त्यांना मोकळेपणाने वागता देखील येत नाही. लग्नानंतर पती-पत्नीचं एक वेगळं नातं सुरू होतं. या नात्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम हा त्या जोडप्यावर होत असतो.
लग्नानंतर पुरूष महिलांना वेळ देत नाही, अशी तक्रार करतात. तसंच काहीस होतं. लग्नापूर्वी त्यांच्याकडे भरपूर वेळ असायचा. पण लग्नानंतर त्यांच्याकडे घराची जबाबदारी आहे. जी त्यांची पहिली प्राथमिकता बनते. त्यामुळे महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात.
मुली लग्न झाल्यानंतर स्वतःतलं लहान मुलं बाजूला सारतात. अनेकदा आपल्याला ज्या गोष्टी आवडतात. त्याकडे लक्ष न देता. संसार, घर यामध्ये महिला अडकतात.
जेव्हा मुली त्यांच्या पालकांच्या घरी राहतात तेव्हा त्यांचे वागणे काहीसे बालिश असते. कारण त्यांना तेथे लाड करण्याचे आणि त्यांना हवे ते करण्याचे स्वातंत्र्य असते.
पण लग्नानंतर त्यांच्या स्वभावात गांभीर्य येते. कारण नवीन नात्यात प्रवेश केल्याने तिच्या खांद्यावर नवीन जबाबदाऱ्यांचे ओझे आले आहे हे तिला चांगलेच समजते.