Urinary tract infections चा त्रास कमी करण्यास फायदेशीर 'हा' घरगुती उपाय

पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा त्रास अधिक जाणवतो. 

Updated: Apr 30, 2018, 09:26 AM IST
Urinary tract infections चा त्रास कमी करण्यास फायदेशीर 'हा' घरगुती उपाय  title=

मुंबई : पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा त्रास अधिक जाणवतो. बॅक्टेरियल इंफेक्शनमुळे हा त्रास अधिक बळावतो. यावर अ‍ॅन्टिबायोटिक्सच्या मदतीने नियंत्रण मिळवता येते. मात्र त्याच्यासोबतीने हा त्रास अधिक वाढू नये म्हणून लिंबू-पाण्यासारखा सुरक्षित, सोपा आणि झटपट उपायदेखील फायदेशीर ठरतो. नैसर्गिकरित्या युरिनरी ट्रक इंफेक्शनचा त्रास टाळण्यासाठी काही स्वच्छतेचे नियम पाळा आणि ग्लासभर लिंबूपाणी प्या.

दिवसाची सुरवात ग्लासभर लिंबूपाण्याने करा. त्यामधील अल्काईन घटक शरीर स्वच्छ करायला मदत करतात.त्यामुळे मूत्रविसर्जनाचा मार्गही स्वच्छ आणि मोकळा होण्यास मदत होते. त्यामधील व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील बॅक्टेरियल विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. त्यामुळे शरीरातील/ मूत्रमार्गातील बॅक्टेरियल इंफेक्शनही कमी होते. तसेच लिंबाचा रस रक्ताप्रमाणेच युरिनरी ट्रॅकमधील pH अ‍ॅसिडीक टू अल्कलाईन करण्यास मदत करतात. त्यामुळे बॅक्टेरियांची वाढ रोखण्यास मदत  होते.

लिंबातील diuretic agent म्हणजेच मूत्रल घटक मूत्राचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. त्यामुळे बॅक्टेरिया शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. नियमित लिंबाचा रस पिण्याच्या सवयीमुळे युरिनरी ट्रॅक इंफेक्शनचा त्रास पुन्हा उलटण्याचा धोकाही कमी होतो.

टीप्स :

युरिनरी इंफेक्शनचा त्रास कमी होईपर्यंत अर्धा लिंबाचा रस कपभर गरम पाण्यात मिसळून नियमित सकाळी प्यावा.
ग्रीन टी, आईस टी, पाणी व पुदीना, आलं आणि मध यामध्ये लिंबू पिळून प्यावे.
सलाडवर ड्रेसिंग करताना लिंबाच्या रसाचा वापर करावा.