जलशामक मुद्रा - पित्त कमी करण्यासाठी फायदेशीर उपाय

वेळी-अवेळी जेवणाची सवय, रात्रीचे जागरण किंवा चमचमीत पदार्थांवर ताव मारल्याने अ‍ॅसिडीटीचा त्रास वाढण्याची शक्यता असते. 

Updated: Apr 25, 2018, 03:26 PM IST
जलशामक मुद्रा - पित्त कमी करण्यासाठी फायदेशीर उपाय  title=

मुंबई : वेळी-अवेळी जेवणाची सवय, रात्रीचे जागरण किंवा चमचमीत पदार्थांवर ताव मारल्याने अ‍ॅसिडीटीचा त्रास वाढण्याची शक्यता असते. प्रामुख्याने आजकालची धावती जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरते. ताण-तणाव आणि मानसिक अस्वथता अनेकदा नकळत आरोग्यावर परिणाम करते. आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांचे आयुष्य अशा अनेक आरोग्याला घातक ठरणार्‍या  सवयीनी भरलेले आहे. 

आरोग्याला मारक ठरणार्‍या अनेक सवयी असल्या तरीही त्याचा प्रभाव रोखण्यासाठी व्यायाम आणि किमान  योगाभ्यास करणे आवश्यक आहे. व्यस्त जीवनशैलीत व्यायाम किंवा योगा करणे शक्य नसले तरीही किमान बसल्या जागी मुद्रा केल्याने अनेक समस्यांचा त्रास कमी करण्यास मदत होते. 

पित्ताचा त्रास होत असल्यास जल शामक मुद्रा फायदेशीर ठरते. मग योगा एक्सपर्ट शामिम अख्तर यांच्या सल्ल्यानुसार जाणून घ्या कशी कराल जल शामक मुद्रा आणि त्याचे होणारे फायदे

कशी कराल जल शामक मुद्रा – :  

मांडी घालून शांत बसा. किंवा आरामदायी खूर्चीत किंवा सोफ्यावर बसा.
करंगळी दुमडून त्यावर अंग़ठा ठेवा.
जल शामक मुद्रा दोन्ही हाताने करा.
काही वेळ ( किमान 3-5 मिनिटे ) डोळे बंद करून बसा.
हात मांडीवर ठेवा.
दिवसभरात तुम्ही जल शामक मुद्रा तुम्ही अनेकदा करू शकता.

जल शामक मुद्रा कशी ठरते फायदेशीर ?

योगा थेरपीनुसार, अंगठा हे अग्नीचे तर करंगळी पाण्याचे स्थान मानले जाते.

करंगळी दुमडल्याने शरीरातील अतिरिक्त पाणी (पित्त स्वरूपात)  असल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.

जल शामक मुद्रा ताण कमी करण्यासही मदत करते.

ताण तणावामुळे पित्त वाढते. पण जलशामक मुद्रा वाढलेले पित्त आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

जल शामक मुद्रेचे इतर फायदे –

पित्त आटोक्यात ठेवण्याप्रमाणेच जल शामक मुद्रेमुळे डायरियाचा त्रास कमी करण्यासही मदत होते.