मुंबई : आता बाजारात फणस सर्वत्र उपलब्ध आहेत. प्रत्येक फळ हे आरोग्यासाठी लाभ दायक असतं. पण त्यामागे काही अटी देखील असतात. त्यामुळे कोणतेही फळ खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्कीचं घ्यावा. फायबर्सयुक्त फणस पोट साफ करण्यास फायदेशीर ठरतात. पण ज्यांना पचनासंबंधित काही त्रास असल्यास फणसाचे सेवन करणे टाळावे. कारण फणसाच्या सेवनाने पचनावर विपरित परिणाम होतो.
- प्रेग्नेंसीच्या काळात महिलांनी फणस खाणे टाळावे. त्यामुळे गर्भातील बाळावर त्याचा परिणाम होतो. त्याचबरोबर स्तनपान करताना फणस खाणे टाळावे.
- कोणतेही ऑपरेशन किंवा सर्जरी झाल्यानंतर फणसाचे सेवन करु नये.
- जेवल्यानंतर पान खाण्याची सवय आहे का? मग ज्या दिवशी पान खाल त्यादिवशी फणस खावू नका आणि फणस खाल्यास त्यावर पानाचा खावू नका.
- पित्ताचा त्रास असलेल्यांनीही फणस खाणे टाळावे.
- फणस खाल्यानंतर दूध पिऊ नका. कारण दूधाची आणि फणसाची प्रक्रिया होऊन दाद, खाज आणि सोरायसिय सारखे आजार होण्याचा धोका असतो.