Liver Damage: तळहात आणि पायांना येतेय खाज, पैसे येणार नाहीत, लिव्हर आहे डॅमेज, डॉक्टरांना गाठा नाहीतर...

 हे संकेत तुम्हालाही मिळत असतील तर तात्काळ डॉक्टरांना ( Contact doctors on priority)  गाठा.

Updated: Oct 3, 2022, 09:13 PM IST
Liver Damage: तळहात आणि पायांना येतेय खाज, पैसे येणार नाहीत, लिव्हर आहे डॅमेज, डॉक्टरांना गाठा नाहीतर... title=

Liver Damage - आपल्या शरीराचा महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं यकृत ( Liver ). आपलं लिव्हर खराब झाल्यास आपल्याला अनेक आरोग्यासंबंधित गंभीर  समस्यांचा सामना ( Serious health issue) करावा लागू शकतो. लिव्हर हे आपल्या पोटाच्या वरच्या एका बाजूला असतं. आपल्या शरीरातील टॉक्सिक म्हणजेच विषारी गोष्टींना तोडण्याचं काम लिव्हरच्या (Liver Function) माध्यमातून केलं जायचं. आपल्या फास्ट जीवनशैलीत ( Fast Lifestyle)  आपल्या वाईट सवयींमुळे लिव्हर ( Bad habits and imapct on liver) खराब होण्याच्या प्रकरणामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. अनेकांना यकृतासंबंधित समस्या असल्याचं जाणवतंय. अनेकदा अनेकजण अशा समस्यांकडे दुर्लक्ष करतात, मात्र असं केल्याने हे जीवावर देखील बेतू शकतं. मात्र आपलं लिव्हर खराब होतंय हे आपल्याला कसं समजू शकेल? यासाठी शरीर आपल्याला काही संकेत देतं, हे संकेत तुम्हालाही मिळत असतील तर तात्काळ डॉक्टरांना ( Contact doctors on priority)  गाठा. कारण तुमचं लिव्हर डॅमेज झालेलं असू शकतं 

लिव्हरची समस्या का उद्भवू शकते?

  • औषधांचा साईड इफेक्ट ( side effects of medicine) असल्यास लिव्हर संबंधित समस्या जाणवू शकते 
  • तुमच्या आहारात अधिक प्रमाणात साखर ( Extra Sugar in Food)  असल्यास 
  • तुम्ही जास्त प्रमाणात प्रोसेस्ड अन्न ( Eating processed food) खात असाल तर
  • तुम्ही भाज्या खात (Not Eating Vegetables) नसाल तर 
  • प्रचंड प्रमाणात दारू ( Drinking liquor) पिण्याने 
  • तुमच्या आहारात मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स (Too much protein)  असल्यास 

नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीज आणि अल्कोहोलिक लिव्हर डिसीज

तज्ज्ञांच्या मते तुम्हाला नॉन अल्कोहोलिक लिव्हर ( non alcoholic liver disease) डिसीज आणि अल्कोहोलिक लिव्हर ( alcoholic liver disease ) डिसीज असू शकतात. म्हणजेच मद्याच्या सेवनामुळे झालेला लिव्हरचा आजार आणि मद्यसेवनाशिवाय झालेला लिव्हरचा आजार असं वर्गीकरण केललं आहे. अल्कोहोलिक लिव्हर डिसीजवर नियंत्रण मिळवण्यासाठी मद्यप्राशन सोडल्यास उपाय करता येऊ शकतात. लिव्हर सिरॉसिस झाल्यास सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत ( Symptoms of liver liver cirrhosis ) नाहीत. कारण लिव्हर खराब झाल्यावरही लिव्हरचं काम सुरूच असतं. म्हणूनच शरीर तुम्हाला जे अलर्ट देतात ते समजून घेणं गरजेचं आहे. लिव्हर सिरॉसिस असल्यास तुम्हाला थकवा जाणवू शकतो. तुमची भूक कमी होते आणि सोबतच तुमचं वजन देखील कमी होतं. अशा वेळी तुमच्या हातावर लाल चट्टे पाहायला मिळू शकतात.  

पायांना सूज येणं : 

तुमचे पाय, तळवे किंवा पायांच्या घोट्या याना वारंवार सूज येत (Swelling on legs or feets) असेल तर याचा संबंध तुमच्या लिव्हरसोबत असू शकतो. तज्ज्ञ म्हणतात अशी लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर फॅटी लिव्हर ( Fatty Liver) किंवा अगदी लिव्हर कॅन्सरही ( Liver Cancer) असू शकतो. योग्य सल्ला घेण्यासाठी डॉक्टरांना भेटा. 

पायाच्या तळव्यांमध्यें दुखणं 

लिव्हर संबंधित समस्यांमुळे तुम्हाला तुमच्या तळव्यांमध्ये ( Pain in feets ) दुखू शकतं. जेंव्हा तुमचं लिव्हर डॅमेज ( Damage liver)  होतं अशा वेळेस तुमच्या सुलेल्या पायांमध्ये विशिष्ट द्रव्य जमण्यास सुरुवात होते. तुमच्या पायांमध्ये सुन्नता येणं, कमजोरी किंवा नर्व्ह डॅमेजचा संबंध क्रॉनिक लिव्हर डिसीजसोबत (chronic liver disease) जोडला गेला आहे. त्यामुळे तुमच्या लिव्हरमध्ये काही बिघाडी असेल तर त्याचा थेट परिणाम पायांवर पाहायला मिळतो. 

पायांच्या तळव्यावर खाज येणं :

हेपिटायटीसच्या काही गंभीर प्रकरणांमध्ये (advance cases of hepatitis) रुग्णांना हात आणि पायांच्या तळव्यांना खाज ( itching on palms and soles) येते. हे मुख्यत्वे pruritus मुळे होतं. याने तुमच्या हात पायांच्या तळव्यांवर खाज येण्यास सुरुवात होते. हात पायांवर खाज येण्यासोबतच तुमची स्किन अतिशय ड्राय होऊ शकते. अशात मॉइश्चरायझर वापरण्याचा डॉक्टर सल्ला देतात. 

(बातमी सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास डॉक्टरांचा / तज्ज्ञांचा सल्ला घ्या)