आंघोळ करणे टाळताय; वेळीच सावध व्हा, नाही तर चढाव्या लागतील हॉस्पिटलच्या पायऱ्या

तुम्ही पावसाळा आणि हिवाळ्यात थंड वातावरणामुळे आंघोळ करणे टाळतात. मग थांबा अशी चूक करु नका. 

Updated: Aug 1, 2022, 01:02 PM IST
आंघोळ करणे टाळताय; वेळीच सावध व्हा, नाही तर चढाव्या लागतील हॉस्पिटलच्या पायऱ्या  title=

Skin Care Tips: पावसाळा हा सगळ्यांनाच आवडतो. पावसाळा म्हटला की पहिले आठवतात गरमा गरम भजी आणि चहा. पावसाळ्यात गरम भजी आणि चहा प्यायची मजा काही औरच असते. पावसाळ्याला सुरुवात झाली की लोक आवर्जून प्लन करतात ते म्हणजे पावसाळी पिकनिक. पावसाळा हा आनंद घेऊन येतो त्यासोबत रोगराईही मोठ्या प्रमाणात पसरते. सर्दी, खोकला आणि तापाची साथ परसरते. हिवाळा आणि पावसाळ्यात अनेक जण पाणी कमी पितात. 

आम्हाला सांगा तुम्ही पावसाळा आणि हिवाळ्यात थंड वातावरणामुळे आंघोळ करणे टाळतात. मग थांबा अशी चूक करु नका. कारण तुमच्या या चुकीमुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल. तुम्ही आंघोळ करणे टाळत असाल तर तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. चला तर जाणून घेऊयात कुठल्या समस्या तुम्हाला त्रासदायक होऊ शकतात. 

1. त्वचा संसर्ग

Healthline नुसार जर तुम्ही रोज आंघोळ केली नाही तर त्वचा संसर्ग होऊ शकतो. त्वचेवर जळजळ, खाज सुटणे आणि बारीक पुळ वगैरे होऊ शकतात. तसंच तुम्हाला इतर गंभीर त्वचेचे आजार होण्याची शक्यता वाढते. पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे अशा विषाणूशी लढण्यासाठी आपलं शरीर कमजोर असतं. त्यामुळे इतर संसर्गाचा धोका वाढतो. 

2. संसर्ग 

हेल्थलाइनच्या मते, आपल्या शरीरावर अनेक जंतू आणि पेशी असतात. जर तुम्ही आंघोळ केली नाही तर शरीरावर मृत पेशी तयार होतात. या मृत पेशीमुळे शरीराचं खूप नुकसान होतं. संसर्ग आणि बॅक्टेरिया इन्फेक्शनच्या समस्या तुम्हाला होऊ शकतात. 

3. अंगाला दुर्गंधी येते

तुम्ही जर नियमित आंघोळ केली नाही तर तुमच्या अंगाला दुर्गंधी येऊ शकते. पावसाळ्यात सगळीकडे ओलावा असतो. पावसात कपडेही सुकत नाही त्यामुळे त्यामध्ये ओलावा राहतो. पावसाच्या पाण्यात पाय ओले राहिल्यानंतर तुमच्या पायाला दुर्गंधी येऊ शकते. त्याशिवाय पायला इन्फेक्शनदेखील होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही आंघोळ केली नाही तर तुमच्या शरीरात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया तयार होतात. 

4. प्रतिकारशक्ती कमजोर होते

जर तुम्ही आंघोळ न करण्यासाठी वारंवार काही ना काही कारण देता. तर वेळीच सावध व्हा कारण Healthlineच्या मते तुमच्या या चुकीमुळे तुमची प्रतिकार शक्ती कमजोर होते. ही चूक केल्यामुळे तुमच्या शरीरातील उपस्थित विषाणून आणि बॅक्टेरियांची संख्या वाढण्यास मदत मिळते. याचा परिणाम म्हणजे तुमच्या शरीराची प्रतिकारक शक्ती कमी होते. 

5. शरीरातील विशिष्ट जागी काळसर डाग पडतात

जर तुम्ही नियमित आंघोळ केली नाही तर शरीरातील विशिष्ट भागातील त्वचा ही काळी पडते. शरारीतील मानेचा भाग, कोपरा, गुडघ्याखालील जागा काळी पडते. जर हा रंग गडद झाल्या तर तुम्हाला त्वचेची समस्या उद्भवू शकते. 

6. चिकटपणा

पावसाळ्यात सगळ्यात जास्त त्रास हा चिकटपणाचा होतो. पावसाळ्यात शरीरातून निघणारा घाम आणि वातावरणातील आद्रता यामुळे आपल्या शरीरात चिकटपणा जाणवतो. त्यामुळे कायम गरम किंवा थंड कुठल्याही पाण्याने आंघोळ करा आणि आरोग्य ठणठणीत ठेवा.