मुंबई : कोरोनानंतर आता मंकीपॉक्सने भारतातही थैमान घातलंय. देशात आतापर्यंत 5 जणांना मंकीपॉक्सची लागण झाल्याचं समोर आलंय. चिंतेची बाब म्हणजे बुधवारी फक्त नोएडा आणि गाझियाबादमधून मंकीपॉक्सचे 3 संशयित रुग्ण आढळलेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. झारखंडमधूनही मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. नोएडातील एका महिलेचा नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, मांकीपॉक्स हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये आलाय. जरी मंकीपॉक्स केवळ काही प्रकरणांमध्येच प्राणघातक ठरतो. मात्र याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. यानुसार, मंकीपॉक्सच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला 21 दिवस वेगळं राहणं आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे मंकीपॉक्सचा इन्क्यूबेशन पीरियड 21 दिवसांचा असतो. याशिवाय मास्क घालणं बंधनकारक आहे. मंकीपॉक्सने प्रभावित त्वचा पूर्णपणे झाकून ठेवणं देखील महत्त्वाचं आहे.
मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काही मार्गदर्शक तत्त्वंही जारी केली आहेत. डब्ल्यूएचओच्या म्हटल्याप्रमाणे, मंकीपॉक्सपासून दूर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याचा संसर्ग टाळणं.
मंकीपॉक्स टाळण्यासाठी, दोन पुरुषांमधील लैंगिक संबंधांबद्दल सर्वात जास्त काळजी घेणं आवश्यक आहे, असं डब्ल्यूएचओचे मत आहे. डब्ल्यूएचओच्या मते, अशा लोकांनी त्यांच्या सेक्स पार्टनर कमी करायला हवे.
डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्सची 98% प्रकरणं पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये आहेत. परंतु मंकीपॉक्स कोणालाही होऊ शकतो, म्हणूनच WHO ने शिफारस केलीये आहे की, सर्व देशांनी मुलं, गर्भवती महिला आणि इतर असुरक्षित गटांमध्ये या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कारवाई करावी.
डब्ल्यूएचओच्या मते, जवळचा संपर्क, मिठी मारणं, किस करणं, संक्रमित व्यक्तीचं बेड आणि टॉवेल वापरणं देखील मंकीपॉक्सच्या प्रसारास कारणीभूत ठरू शकतं. WHO च्या मते, मंकीपॉक्स टाळण्यासाठी या सावधगिरींचं पालन करणं खूप महत्वाचं आहे.