गरोदर स्त्रियांंसाठी विमानप्रवास सुरक्षित आहे का ?

गरोदरपणाचा काळ म्हटला की त्या स्त्रीपेक्षा तिच्या आजुबाजूच्या व्यक्तीच अधिक सतर्क असतात.

Updated: Aug 26, 2018, 12:52 PM IST
गरोदर स्त्रियांंसाठी विमानप्रवास सुरक्षित आहे का ?  title=

मुंबई : गरोदरपणाचा काळ म्हटला की त्या स्त्रीपेक्षा तिच्या आजुबाजूच्या व्यक्तीच अधिक सतर्क असतात. अनेक लहान लहान गोष्टींबाबत सल्ला देत असतात. गरोदरपणाच्या काळात प्रवास करण्याबाबतही सतत सल्ले दिले जातात. प्रामुख्याने विमानप्रवास करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे. हे तुम्हांला ठाऊक आहे का? 

विमानप्रवासादरम्यान गरोदर स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी ? 

विमानप्रवासात सीटबेल्ट लावणं आवश्यक असतं. मात्र गरोदर स्त्रियांनी हा सीटबेल्ट पोटाच्या खालच्या बाजूला बांधावा. 

प्रवासादरम्यान योग्य कपड्यांची निवड करण आवश्यक आहे. आरामदायी कपडे घालावेत. फार घट्ट कपडे टाळा. 

प्रवासादरम्यान पाणी मुबलक प्रमाणात पिणे आवश्यक आहे. यामुळे डिहायड्रेशनचा धोका कमी होतो. 

तुमची विमानातील आसनव्यवस्था वॉशरूमच्या जवळपास असेल याची खात्री करा. त्यासाठी फ्लाईट अटेन्टंटशी बोला. 

अनेकांना टेक ऑफ आणि लॅन्डिंगच्या दरम्यान श्वास घेताना त्रास होईल अशी भीती असते. मात्र विमान उंचावर असले तरीही पुरेसा ऑक्सिजन असतो. 

मेटल डिटेक्टरच्या बाबतीतही अनेकींच्या मनात शंका असते. मात्र त्याचा बाळाच्या आरोग्यावर थेट परिणाम होण्याचा धोका नसतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने पुरेशी काळजी घेत विमानप्रवास करायला घाबरू नका.