सतत भूक लागणं या '6' आजारांचे देते संकेत

भूक लागणं ही एक सामान्य क्रिया आहे. 

Updated: Aug 26, 2018, 12:05 PM IST
सतत भूक लागणं या '6' आजारांचे देते संकेत  title=

मुंबई : भूक लागणं ही एक सामान्य क्रिया आहे. त्याद्वारा शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्याचं कार्य सुरळीत चालतं. मात्र भूकेचे गणित बिघडणं हे शरीरात काही दोष वाढत असल्याचे लक्षण आहे. डिहायड्रेशन किंवा गरोदरपणात सतत भूक लागू शकते. मात्र तुम्हांला सतत भूक लागत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे. 

सतत भूक लागण्याची कारण आणि आजार 

1. मधुमेह - 

भारताला मधुमेहाची राजधानी म्हणतात. मधुमेह हा आजार आबालवृद्धांमध्ये झपाट्याने वाढत आहे. बदलत्या लाईफस्टाईमुळे हा आजार वयाच्या कोणत्याही टप्प्यावर बळावण्याचा धोका वाढला आहे. सतत भूक लागणं हे मधुमेहातील एक लक्षण आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. 

2. इटिंग डिसऑर्डर 

बुलूमिया ही एक इटिंग डिसऑर्डर आहे. यामध्ये रूग्ण अनियमितपणे खातात. अति खाल्ल्याने अनेकदा रूग्णांना उलटीचा त्रास होतो. 

3.पोटात जंत

पोटात जंत झाल्यास तुम्हांला सतत  भूक लागू शकते. कारण जंत परजीवी असतात. अनेकदा ते पोटातील आहारातून मिळणारी पोषकद्रव्यं शोषून घेतात. यामधूनच शरीरात फॅट वाढणं, रक्तातील साखरेची पातळी वाढणं अशा समस्या बळावतात.  जंताचा त्रास समूळ हटवण्यासाठी टोमॅटोसोबत 'हा' मसाल्याचा पदार्थ खाणं फायदेशीर

4. औषधं - 

काही औषधांमुळेही सतत भूक वाढते. या समस्येला हायपरफेजिया म्हणतात. कोर्टिकोस्टेरोइड्स, साइप्रोफेटेडाइन आणि ट्राईसाइक्लिक अशा अ‍ॅन्टी डिसप्रेसंट औषधांच्या सेवनामुळे अधिक भूक लागू शकते. 

5. पीएमएस - 

पीएमएस म्हणजेच प्रिमेंस्ट्राईल सिंड्रोमच्या समस्येमध्ये सतत भूक लागणं हे लक्षण आढळते. यासोबतच डोकेदुखी, पोटात मुरडा मारणं, बद्धकोष्ठतेचा त्रास बळावू शकतो. 

6. ताण तणाव 

ताणतणावामध्ये असणार्‍या व्यक्तीदेखील अनियमितपणे खात असतात. यामुळे त्यांच्यामध्ये सतत खाण्याची इच्छा बळावत राहते. मेंदूवर ताण आल्यानंतर कॉर्टिकोट्रोपिनचा प्रवाह वाढतो. यामधूनच अड्रेनालाइनचं प्रमाणही वाढतं. हे भूकेचं प्रमाण वाढण्याचं एक कारण आहे. ... म्हणून भूक लागल्यावर राग अनावर होतो