उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांंनी अंड खाणं सुरक्षित आहे का ?

उन्हाळ्याच्या दिवसात मुलं घरी असल्याने त्यांना सतत खायला काय दयावे? 

Updated: May 10, 2018, 07:52 PM IST
उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांंनी अंड खाणं सुरक्षित आहे का ? title=

 मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात मुलं घरी असल्याने त्यांना सतत खायला काय दयावे? हा प्रश्न पालकांच्या मनात येतो. उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना कडक उन्हाचा त्रास होऊ नये याचे भान राखत नेमके कोणते हेल्दी टेस्टी पदार्थ द्यावेत हा अनेकांच्या मनात येणारा प्रश्न आहे.  अंड हे गरम असल्याने मुलांना त्रास होऊ नये, पित्त, पचनाचा त्रास, डीहायड्रेशनमुळे आजारपण वाढू नये म्हणून अनेकींना त्यांच्या मुलांना अंड देऊ नये असे मनात येते. पण तुमच्या मनातील या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी खास एक्सपर्ट सल्ला जाणून घ्या. 

 अंड आरोग्यदायी   

 अंड हे आरोग्यदायी आहे. मुलांच्या वाढीच्या दिवसात आवश्यक असणारे पोषक घटक, प्रोटीन, व्हिटॅमिन घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे मुलांच्या आहारात अंड्याचा समावेश करणं आवश्यक आहे. अंड शाकाहारी की मांसाहारी? या वादावर वैज्ञानिकांंचा आश्चर्यकारक खुलासा

काय आहे तज्ञांचा सल्ला ? 

तज्ञांच्या सल्ल्यानुसार, अंड हे थोडं अ‍ॅसिडीक असते. त्यामुळे अतिरिक्त प्रमाणात अंड्याचे सेवन केल्यास शरीरात उष्णता वाढू शकते. कोणत्याही प्रोटीन घटकामुळे शरीरात उष्णता वाढू शकते. मुलांच्या आहारात दिवसाला 2 अंड्याचा समावेश करणं सुरक्षित आहे. मात्र मुलांच्या पचनशक्तीवरदेखील अनेक गोष्टी अवलंबून असतात. प्रौढांप्रमाणे लहान मुलांचे मेटॅबॉलिझम नसल्याने मुलांच्या आवडीनुसार त्यांना अंड खायला द्यावे.