घरापासून दूर राहणाऱ्या महिला अधिक...; Sex Life बाबत धक्कादायक खुलासा

भारतीयांमध्ये एचआयव्हीसारख्या (HIV) जीवघेण्या आजाराचा धोका समजून घेण्यासाठी त्यांच्या लैंगिक जीवनाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले होते. यामध्ये भारतीयांच्या सेक्स लाईफबद्दल अनेक मोठ्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत. 

Updated: Dec 26, 2022, 08:14 PM IST
घरापासून दूर राहणाऱ्या महिला अधिक...; Sex Life बाबत धक्कादायक खुलासा title=

Indians Sex Life : आजच्या घडीलाही लोकं सेक्स किंवा लैगिंक संबंध (Physical Relation) याबाबत खुलेपणाने बोलणं शक्यतो टाळतात. मात्र अनेक गंभीर आजार (Health Problems) टाळण्यासाठी याबाबत बोलणं गरजेचं आहे. कधीकधी या संकोचापोटी लोकांना धोकादायक आजारांचा सामना करावा लागू शकतो. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्याच्या पाचव्या सर्वेक्षणात (Fifth National Survey of Family Health) भारतीयांमध्ये एचआयव्हीसारख्या (HIV) जीवघेण्या आजाराचा धोका समजून घेण्यासाठी त्यांच्या लैंगिक जीवनाशी (NFHS survey) संबंधित अनेक प्रश्न विचारले होते. यामध्ये भारतीयांच्या सेक्स लाईफबद्दल  अनेक मोठ्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत. 

नॅशनल फॅमिली हेल्थच्या अहवालात असं नमूद करण्यात आलंय की, एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर किंवा घरात राहणार्‍या जोडीदाराव्यतिरिक्त इतरांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याने एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा धोका लक्षणीय वाढतो.

या सर्वेक्षणात 15-49 वयोगटातील स्त्री-पुरुषांना त्यांच्या गेल्या 12 महिन्यांच्या लैंगिक जीवनाविषयी प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात 1 टक्क्यांहून कमी महिलांनी (0.3 टक्के) आणि एक टक्के पुरुषांनी एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत Physical Relation ठेवल्याचं मान्य केलं. 

दुसरीकडे एका टक्‍क्‍यांपेक्षा कमी महिला (0.5 टक्‍के) आणि 4 टक्‍के पुरूषांनी सांगितलं की, त्‍यांचे पार्टनर किंवा घरात राहणार्‍या व्‍यक्‍तीशिवाय इतर कोणाशीही शारीरिक संबंध आहेत.

लोक एक महिना किंवा त्याहून अधिक काळ घरापासून दूर असले तरीही एकापेक्षा जास्त लैंगिक जोडीदार असण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे हा कल सुशिक्षित तसंच श्रीमंत भारतीयांमध्ये अधिक दिसून आला.

घरापासून दूर राहणाऱ्यांची सेक्स लाईफ

जेव्हा लोक घराबाहेर असताततात तेव्हा सेक्सशी संबंधित आकडे बदलतात. घरातून बाहेर राहणाऱ्या महिला पुरुषांपेक्षा जास्त सेक्शुअली एक्टिव्ह असतात (Women have more sex partners), असं समोर आलं आहे. जेव्हा महिला एक महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळ घरापासून दूर राहतात तेव्हा त्यांच्या सेक्शुअल पार्टनर्सची संख्या सरासरी 1.7 च्या तुलनेत 2.3 पर्यंत वाढली. (पुरुषांसाठी 2.1 राहते). 

या अहवालात नमूद केल्यानुसार, 56 टक्के मुलींचं असं म्हणणं आहे की, त्या घराबाहेर किंवा घरापासून दूर असताना सेक्स करतात. घरापासून दूर असताना केवळ 32% पुरुष शारीरिक संबंध ठेवतात.