भारतीय महिलेला 70 व्या वर्षी मातृत्त्वं; ही तर IVF ची कमाल

वयाच्या 70 व्या वर्षी एका महिलेने IVF प्रक्रियेद्वारे बाळाला जन्म दिला आहे.

Updated: Dec 23, 2021, 08:42 AM IST
भारतीय महिलेला 70 व्या वर्षी मातृत्त्वं; ही तर IVF ची कमाल  title=

वडोदरा : IVF प्रक्रिया ही अनेक कुटुंबासाठी एक नवा आशेचा किरण मानली जाते. या विकसीत मेडिकल सायन्स आणि टेक्नॉलॉजीमुळे अनेक जोडप्यांचं आयुष्यचं जणू बदललं. गुजरातमधील एका कुटुंबासोबतंही असंच घडलंय. मात्र यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे वयाच्या 70 व्या वर्षी एका महिलेने IVF प्रक्रियेद्वारे बाळाला जन्म दिला आहे.

गुजरातमधील एका महिलेने लग्नाच्या 45 वर्षांनंतर वयाच्या 70 व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या जोडप्याला आई-वडील बनण्याचा आनंद मिळाला आहे. हे असं तंत्र आहे ज्याद्वारे वंध्यत्वाने त्रस्त असलेल्या जोडप्याला मूल होण्याचा आनंद मिळतो.

जीवुबेन रबारी असं या महिलेचं नाव असून त्यांचा दावा आहे की, मुलाला जन्म देणारी ती सर्वात वयस्कर महिला आहे.

जीवुबेन आणि मालधारी यांचं लग्न 45 वर्षांपूर्वी झालं होतं मात्र त्यांना आई-वडील होण्याचं सुख मिळालं नव्हतं. मात्र पालक होण्याची इच्छा असल्याने आनंदासाठी आयव्हीएफ तंत्राची मदत घेतली. 

या वयात मुलाला जन्म देणं थोडं कठीण होतं आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो असं डॉक्टरांनी आधीच या जोडप्याला स्पष्ट केलं होतं, त्यानंतरही त्यांनी या प्रक्रियेचा विचार केला आणि त्यांनी या प्रक्रियेला सहमती दर्शवली.

काय आहे आयव्हीएफ प्रक्रिया

IVF ही स्पर्म आणि एग्ज शरीराबाहेर फर्टिलाईज करण्याची प्रक्रिया आहे आणि जेव्हा ते गर्भ बनण्यासाठी फर्टिलाइज होतं तेव्हा ते स्त्रीच्या गर्भाशयात ठेवलं जातं. या प्रक्रियेमध्ये स्त्रीला तिच्या आतून मॅच्युअर एग्ज बनवण्यासाठी औषधं दिली जातात. 

सोप्या प्रक्रियेत ही एग्ज स्त्रीच्या शरीरातून काढली जातात. यानंतर, त्या महिलेच्या जोडीदाराच्या किंवा दात्याच्या स्पर्मसह लॅबमध्ये फर्टिलाइज केली जातात आणि गर्भ तयार केला जातो. 

ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाते आणि ती पूर्ण होण्यासाठी 1 ते 3 महिने लागतात. जेव्हा सर्व काही व्यवस्थित होतं तेव्हा गर्भधारणा होण्यासाठी IVF हा एक उत्तम मार्ग मानला जातो.