लंडन : लंडनमध्ये एका मुलाने असं कृत्य केलं आहे जे वाचून प्रत्येकाला धक्का बसणार आहे. स्वतःचं गुप्तांगाची आकार तपासणं या मुलाला फारच महागात पडलं आहे. गुप्तांगाचा आकार तपासण्यासाठी या मुलाने USB केबलचा वापर केला असल्याचं समोर आलं आहे.
झालं असं की, हा मुलगा त्यांच्या गुप्तांगाचा आकार तपासण्यासाठी USB केबलचा वापर करत होता. या दरम्यान, केबल आत अडकली. युवकाने यूएसबी केबल काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा परिस्थिती अधिकच बिकट झाली. त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येऊ लागलं. यानंतर त्याने ही गोष्ट पालकांना सांगितली असता त्यांनी त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केलं.
'द सन' मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, लंडनमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने डॉक्टरांना सांगितलं की, तो आपला प्रायव्हेट पार्ट यूएसबी केबलने मोजत आहे. या दरम्यान केबल आतमध्ये अडकली. त्याने केबल काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा रक्तस्राव होऊ लागले. यानंतर त्याने कुटुंबातील सदस्यांना मदतीसाठी बोलावलं. पालक प्रथम त्या तरुणाला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले, पण तेथून त्याला युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटल लंडनला जाण्यास सांगितलं.
युएसबी केबल काढण्यासाठी डॉक्टरांना त्या तरुणाच्या प्रायव्हेट पार्टजवळ मोठा छेद करावा लागला. दरम्यान यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली.
डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात असं म्हटलं आहे की, तरुणाला कोणतीही अंतर्गत दुखापत झालेली नाही. शस्त्रक्रियेच्या एक दिवसानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु दोन आठवड्यांनंतर त्याला स्कॅनिंगसाठी यावं लागणार आहे. डॉक्टर काही दिवस त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवतील. डॉक्टरांनी इशारा दिला आहे की, असे प्रयोग घातकही ठरू शकतात.