मुलांची उंची वाढवण्यासाठी तुम्हीही त्यांच्यासोबत असं काही करताय का?

मात्र उंची वाढावी यासाठी एका महिलेने तिच्या मुलीसोबत असं काही केलं ज्यामुळे तुम्हाला देखील धक्का बसेल. 

Updated: Sep 15, 2021, 08:58 AM IST
मुलांची उंची वाढवण्यासाठी तुम्हीही त्यांच्यासोबत असं काही करताय का? title=

मुंबई : उंची वाढावी यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करतात. यामध्ये दोरीच्या उड्या तसंच एक्सरसाईज करण्यावर भर दिला जातो. मात्र उंची वाढावी यासाठी एका महिलेने तिच्या मुलीसोबत असं काही केलं ज्यामुळे तुम्हाला देखील धक्का बसेल. 

जेनजियांग प्रांतातील ही घटना आहे. यामध्ये आईने तिच्या मुलीला इतकं टॉर्चर केलं की तिचे गुडघे खराब झाले. यावेळी आईने तिच्याय मुलीची उंची वाढवण्यासाठी इतका व्यायाम करायला लावला की येणाऱ्या काळात मुलीला चालण्यात अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

झेंजियांग प्रांतातील हांग्झो या ठिकाणी एका आईने तिच्या 13 वर्षीय मुलीला दिवसातून 3000 वेळा दोरीच्या उड्या मारण्यास लावल्या. मुलीने तिच्या आईकडे याबाबत अनेक वेळा तक्रार केली की, जास्त व्यायामामुळे तिचे सांधे दुखत आहेत. मात्र, तिच्या आईला उंची वाढवण्याचं वेड होतं. 

डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, उंची वाढवण्याच्या वेडापायी या मुलीच्या आईने डॉक्टरांचा सल्लाही घेतला नाही. पण जे ऐकलं त्यावर विश्वास ठेवून, तिच्या मुलीला दोरीवर उडी मारून ठेवली. सुरुवातीला, ती मुलीला 1000 वेळा दोरीवर उडी मारायला सांगायची. मात्र काही दिवसांनंतर दिवसाला 3000 स्किपिंग करण्यास सांगू लागली.

मुलीचे गुडघे झाले खराब

मुलासह आईचा हा अत्याचार सलग 3 महिने चालला. यानंतर, मुलाच्या गुडघ्यांचं नुकसान झाल्याचे संकेत मिळू लागले. मग आईने तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी सांगितले की, मुलीला ट्रॅक्शन अपोफिसिटिस (Traction Apophysitis) झाला आहे. आता चीनमधील या महिलेला पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

ट्रॅक्शन अपोफिसिटिस ही मुलांना आणि किशोरवयीन मुलांना कार्टिलेजमधील दुखापत आणि हाडांच्या जोडणीला झालेली जखम असते.