Workout नंतर पाणी पिताना 'या' चुका कधीही करु नका, नाहीतर होईल मोठं नुकसान

Workout नंतर थंड पाणी प्याल, तर स्वत:चं नुकसान कराल.

Updated: Apr 18, 2022, 09:43 PM IST
Workout नंतर पाणी पिताना 'या' चुका कधीही करु नका, नाहीतर होईल मोठं नुकसान title=

मुंबई : सध्या बरेच लोक आपल्या आरोग्याकडे आणि शरीराकडे जास्त लक्ष देत आहेत. यासाठी ते योगा, जिम, वर्कआउट किंवा मॉर्निंग वॉककडे वळले आहेत. परंतु असं करत असताना बऱ्याच लोकांना आरोग्याशी संबंधीत अनेक गोष्टी माहिती नसतात. ज्यामुळे त्यांच्याकडून न कळत चुका घडतात. त्यांपैकीच एक आहे, ती म्हणजे पाणी पिण्याची पद्धत.

व्यायामानंतर तुम्हला थंड पाणी पिण्याची सवय असेल, तर तुम्ही अनेक प्रकारच्या रोगांना मेजवानी देत आहात हे लक्षात ठेवा. यामध्ये हृदयविकाराचा झटका येण्यापासून ते वजन वाढण्यापर्यंतचा समावेश आहे. यामुळेच वर्कआउट केल्यानंतर थंड पाणी पिऊ नये, असे तज्ञांचे मत आहे.

याशिवाय इतर कोणत्या समस्या येऊ शकतात आणि थंड पाणी का पिऊ नये? हे जाणून घेऊ या.

थंड पाणी का पिऊ नये?

- वर्कआउट केल्यावर तुमचे शरीर गरम होते. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही थंड पाणी पितात, तेव्हा अचानक तुमच्या शरीराचे तापमान खाली उतरते, ज्यामुळे तुमच्या वर्कआउटची मेहनत वाया जाते. यासोबतच तुम्हाला सर्दीची तक्रार होण्याची शक्यता आहे.

- याशिवाय वर्कआउट केल्यानंतर थंड पाणी पिण्याचा परिणाम हृदयाच्या गतीवरही होतो. वास्तविक, वर्कआउट दरम्यान, तुमच्या नसांमध्ये जलद रक्त धावू लागते, अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही अचानक थंड पाण्याचे सेवन करता, तेव्हा ते तुमच्या नसा खूप लवकर थंड करू शकतात.

- याशिवाय वर्कआऊट केल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने, तुम्हाला डोकेदुखीची तक्रार उद्भवू शकते. तसेच सायनसच्या रुग्णांनी थंड पाणी अजिबात पिऊ नये. कारण यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो.

- तसेच तुमच्या पचनावरही परिणाम होऊ शकतो. वास्तविक, व्यायाम केल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात थंड-गरम स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते, ज्यामुळे तुम्हाला ओटीपोटात दुखणे, पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.