मातांनो, जर बाळाला बाटलीतून दूध देत असाल तर सावधान...

लहान मुलांना दूध पाजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दूधाच्या बाटली़मध्ये मोठ्या प्रमाणात घातक रसायनांचा समावेश करण्यात येतो.

Updated: May 2, 2019, 07:37 PM IST
मातांनो, जर बाळाला बाटलीतून दूध देत असाल तर सावधान... title=

मुंबई : जर तुम्ही तुमच्या बाळाला बाटली मधून दूध देत असाल तर सावधान... बाटली मधील दूध तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी फार घातक ठरण्याची शक्यता आहे. लहान मुलांना दूध पाजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दूधाच्या बाटली़मध्ये मोठ्या प्रमाणात घातक रसायनांचा समावेश करण्यात येतो. एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. डॉक्टरही दूध पाजण्यासाठी दूधाची बाटली न वापरण्याचा सल्ला देतात. 

दूधाची बाटली आणि सिपरमध्ये घातक रसायन असल्याचे संशोधनातून साध्य झाले आहे. हे रसायन मुलाच्या आरोग्यस घातक आहे. 'बिस्फेनॉल-ए' नावाच्या रसायनाचा समावेश  दूधाची बाटली आणि सिपरमध्ये असतो.  

केलेल्या संशोधनात १४ दूधाच्या बाटल्या आणि ६ सिपरचे नमुने घेण्यात आले होते. हे नमुने दिल्ली व्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, केरळ, आंध्र प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, मणिपूर मधून घेण्यात आले होते. घेण्यात आलेल्या नमुन्यांचे निरीक्षण इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी, गुवाहाटीमध्ये करण्यात आले. ज्यामध्ये हे स्पष्ट झाले की, बाटलीतील रसायने मुलांच्या शरीरात पोहोचत आहेत. 

डॉक्टर तपीशा गुप्ता यांनी दिलेल्या माहितानूसार, दूधाच्या बाटलीमधून मुलांना सतत दूध दिल्यास त्यांच्या गळ्याला सुज आणि उल्टी होण्याची शक्यता आहे. डायरिया सुद्धा होवू शकतो. म्हणून नेहमीच मेडिकेड बाटली वापरा. वैद्यकीय स्टोअरमध्ये चांगल्या दर्जाच्या  दूधाच्या बाटल्या उपलब्ध आहेत.

पॉली कार्बोनेटच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या बेबी बॉटलवर बीआईएसने बंदी घातली होती. २०१५ साली बेबी बॉटलवर बंदी घातली होती. त्यानंतरही या बाटल्या मार्केटमध्ये सर्रास विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या आजारांसाठी मुख्य कारण दूधाच्या बाटल्या आहेत.