तुमचाही चेहरा सतत सुजलेला दिसतो का? 'हे'आहे कारण..त्वरित करा उपाय

तुम्ही तुमच्या स्किन टाईप नुसार काकडी,टोमॅटो गाजर यांचे आईसक्युब बनवून ते वापरू शकता

Updated: Jul 30, 2022, 09:46 PM IST
तुमचाही चेहरा सतत सुजलेला दिसतो का? 'हे'आहे कारण..त्वरित करा उपाय title=

BEAUTY TIPS:  आजकाल तासनतास स्क्रीनसमोर बसून काम करणं किंवा कामाचा ताण,एकूणच बदललेली जीवनशैली या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.आपल्या चेहऱ्यावरील त्वचा खूप नाजूक असते ,सतत स्क्रीनसमोर बसल्याने किंवा अपुरी झोप मिळाली असेल तर चेहरा सुजलेला दिसतो बऱ्याचदा डोळ्यांखाली सूज दिसते,डोळ्याखाली काळी वर्तुळं येऊ लागतात . आणि हळू हळू स्किनचा ग्लो सुद्धा कमी होऊ लागतो स्किन निस्तेज दिसू लागते अशावेळी काही घरगुती उपाय आहेत ज्यांमुळे तुम्ही यावर मात करू शकता आणि गेलेला ग्लो पुन्हा मिळवू शकता. 

आईस फेशिअल 

हो बर्फाने केलेलं फेशिअल जे तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे या पद्धतीत तुम्ही बर्फ चेहऱ्यावर सर्क्युलर मोशन मध्ये फिरवून मसाज करू शकता .बर्फ चेहऱ्यावर फिरवल्याने खूप फायदे होतात .आईस फेशिअल ने तुमचा गेलेला ग्लो पुन्हा तर येतोच त्याचसोबत चेहऱ्यावर असलेलं एक्सेस ऑइल सुद्धा रोखण्यास हे मदतगार आहे या प्रोसेस ला कोल्ड थेरपी किंवा  क्रोपोथेरपी असं म्हणतात या द्वारे चेहऱ्यावरील पफीन्सस म्हणजेच सूज कमी होऊ शकते ..तुम्ही तुमच्या स्किन टाईप नुसार काकडी,टोमॅटो गाजर यांचे आईसक्युब बनवून ते वापरू शकता 

चेहऱ्यावरील पफीनेस दूर करायचा असेल तर बर्फ थोडा वेळ संपूर्ण चेहऱ्यावर घासू शकता ज्याने खूप फ्रेश वाटेल आणि सूज नक्की कमी होण्यास मदत होईल. 

चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी कॅफेनयुक्त आईस फेशिअल खूप फायदेशीर आहे .अगदी काही मिनिटं  बर्फाचा तुकडा चेहऱ्यावर फिरवायचा आहे याचा उत्तम परिणाम तुम्हाला काही दिवसातच दिसू लागेल. 

पिम्पल्सवर सुद्धा फायदेशीर आईस फेशिअल 

तुम्ही चेहऱ्यावर पिंपल्स मुळे हैराण असाल तर आईस फेशिअल यासाठी सुद्धा तितकंच फायदेशीर आहे..कारण चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यामुळे स्किन मधील एक्सएस ऑइल कंट्रोल मध्ये येतं ज्यामुळे पिंपल्सचा त्रास कमी होतो.मात्र वापरताना एक खबरदारी नक्की घ्या चेहऱ्यावर पिंम्पल्स असतील तर एखाद्या टिशू मध्ये किंवा स्वच्छ कापडात आईस घ्या आणि मग चेहऱ्यावर लावा जेणेकरून बॅक्टरीया चेहऱ्यावर इतरत्र पसरणार नाहीत 

आईस फेशिअलसाठी काही टिप्स 

चेहऱ्यावर बर्फ वापरणार असाल तर स्वच्छ आईस ट्रे मधेच बर्फ ठेवा 
आईसिंग आधी चेहरा स्वच्छ धुवायला विसरू नका 
स्किन टाईप नुसार ग्रीन टी ,काकडी,गाजर वापरून आईस क्यूब बनवून ते वापरावे 
एका स्वच्छ भांड्यात तुम्ही बर्फाचे तुकडे घेऊन त्यात काही वेळासाठी चेहरा पूर्णपणे बुडवू शकता हे एक प्रकारे थेरपी सारखं काम करतं ..