टुथपेस्टचा आरोग्यावर होतोय 'हा' सगळ्यात गंभीर दुष्परिणाम

आजारांना दूर ठेवण्यासाठी कळत नकळत संपर्कात येणार्‍या विषाणूंना दूर ठेवणं गरजेचे आहे. 

Updated: Jun 3, 2018, 12:20 PM IST
टुथपेस्टचा आरोग्यावर होतोय 'हा' सगळ्यात गंभीर दुष्परिणाम  title=

मुंबई : आजारांना दूर ठेवण्यासाठी कळत नकळत संपर्कात येणार्‍या विषाणूंना दूर ठेवणं गरजेचे आहे. जेवणापूर्वी हात धुण्यासाठी साबण किंवा सॅनिटायझर, तोंडाचं आरोग्य जपण्यासाठी टूथपेस्टचा आपण वापर करतो. मात्र यामधील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी फंगल घटक ट्राउक्लोजन आरोग्याला हानीकारक आहे हे तुम्हांला ठाऊक आहे का?  

कॅन्सरचा धोका  

ट्राईक्लोजन घटकामुळे आतड्यांना सूज येण्याचा धोका असतो. सोबतच कॅन्सरही बळावू शकतो. उंदरांवर केलेल्या प्रयोगानुसार, यामुळे आतड्याशी निगडीत त्रास सुरू होण्यास सुरू वात होते. हळूहळू यामधून कॅन्सर वाढतो.  साइंस ट्रांस्लेशनल मेडिसीनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, ट्रायक्लोजन घटक आरोग्यावर विपरित परिणाम करण्यास कारणीभूत ठरते. 

उंदरांवर केला प्रयोग 

ट्रायक्लोजन घटकाचा आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याकरिता उंदरांना ट्राउक्लोजन घटक असलेले पदार्थ देण्यात आले. या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार ट्रायक्लोजनच्या वापरामुळे उंदरांचे आरोग्य बिघडलं. त्यांच्या आताड्यांमध्ये अधिक प्रमाणात सूज आढळून आली.