रात्री सतत येणारा खोकला आटोक्यात ठेवण्यासाठी खास उपाय

पावसाळा आणि लहान मुलांची शाळा सुरू झाली आहे. 

Updated: Jun 19, 2018, 02:23 PM IST
रात्री सतत येणारा खोकला आटोक्यात ठेवण्यासाठी खास उपाय  title=

मुंबई : पावसाळा आणि लहान मुलांची शाळा सुरू झाली आहे. यादिवसांमध्ये लहान मुलांना सर्दी, पडसे, खोकल्याचा त्रास हमखास होतो. सर्दी,  खोकला संसर्गजन्य असल्याने तो झपाट्याने पसरतो. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने हा त्रास अधिक वाढतो. रात्रीच्या वेळेस झोपेत खोकल्याची उबळ येण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे लहान मुलांसोबतच घरातील इतर व्यक्तीदेखील हैराण होतात. मग या समस्येवर उपाय म्हणून काही घरगुती उपाय नक्की आजमावून पहा. 

खोकला कमी करण्यासाठी घरगुती उपाय 

लिंबू-तुळशीचा काढा - 

खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठू गरम पेय फायदेशीर ठरते. लिंबातील व्हिटॅमिन सी खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी मदत करते सोबतच रोगप्रतिकारशक्ती सुधारते. 

मूठभर तुळशीची पानं, चमचाभर लिंबाचा रस एकत्र उकळा. 15 मिनिटं हे मिश्रण एकत्र उकळून गाळून प्यायला द्यावे. 

हा काढा रात्री जेवल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी देणं अधिक फायदेशीर आहे. 

कोरफड -  

कोरफड ही स्वादरहित असते. मात्र त्याचा फायदा खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी होतो. कोरफडीच्या गरामध्ये मध मिसळून प्यावे. यामुळे खोकला, कफचा त्रास कमी होण्यास मदत होते. 

कोरफडीच्या गरामध्ये दालचिनीची पावडर मिसळून खाणं फायदेशीर ठरतं. 

रात्री झोपण्यापूर्वी हे चाटण दिल्यास कफ मोकळा होण्यास मदत होते.