आल्याचं साल काढण होतं कठीण? 'या' 3 Tips चा करा वापर

जाणून आल्याचं साल काढण्याच्या सोप्या पद्धती...

Updated: Nov 4, 2022, 04:12 PM IST
आल्याचं साल काढण होतं कठीण? 'या' 3 Tips चा करा वापर  title=

मुंबई : आलं (Ginger) ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या किचनमध्ये सर्रास मिळते. चहापासून जेवणात आल्याचा उपयोग होतो. असे अनेक लोक आहेत ज्यांना आल्याशिवाय चहा अपूर्ण वाटतो. हिवाळ्यात आल्याची मागणी वाढते. आल्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन , लोह, आयरन आणि कॅल्शियम आणि अनेक प्रकारचे पोषक घटक त्यात असतात. (Kitchen Hacks) त्यामुळे आलं हे आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. आल्याचा तुकडा चघळल्याने सर्दी, खोकल, पोटदुखी, हाय कोलेस्ट्रॉल, मायग्रेन आणि ब्लड प्रेशर मध्ये खूप फायदा होतो. 

झटपट आल्याचं साल कसं काढाल

आल्याचे अनेक फायदे आहेत. परंतु सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याचा आकार, ज्यामुळे त्याचं साल काढण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आज आपण आल्याचं साल काढण्याची सोपी पद्धत जाणून घेणार आहोत. ज्यामुळे आल्याचं साल काढणं तुम्हाला सोपं होईल. 
 
1. थोडा वेळ आधीच फ्रीजमधून बाहेर काढा
आल्याचा वापर कमी प्रमाणात केला जातो, त्यामुळे बहुतेक वेळा ते फ्रीजमध्ये ठेवावे लागते, त्यामुळे त्याची साल सुकते. जेव्हा तुम्हाला आल्याचं साल काढायचं आहे, त्याच्या 15 मिनिटं आधी ते फ्रीजमधून बाहेर काढा. आलं Room Temperture वर आल्यानंतर चाकूच्या मदतीनं त्याचं साल काढा. (how to peel ginger easily use spoon slice into pieces or put out 15 minutes before from fridge know details) 

2. एक चमचा वापरा
अनेक वेळा आल्याचं साल काढताना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. या प्रकरणात, आपण चमच्याची मदत घेऊ शकतो. आल्याची साल पातळ असेल आणि धारदार चमच्याने काढण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमचे काम सोपे होईल आणि जास्त वेळ लागणार नाही.

3. आल्याचे तुकडे करा
आल्याचा आकार सरळ आणि सपाट नसतो, त्यामुळे ते सोलताना खूप त्रास होतो. यामुळे, आलं सोलण्यापूर्वी, त्याचे 1 ते 2 इंचाचे लहान तुकडे करा. आता चमच्यानं, चाकूनं किंवा पाइलरच्या मदतीनं तुम्ही ते सहज सोलू शकता. (how to peel ginger easily use spoon slice into pieces or put out 15 minutes before from fridge know details) 

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)