मुलींच्या मनातलं ओळखायला मदत करतील 'या' टीप्स

मुलींच्या मनातलं ओळखणं हे एक महाकठीण काम आहे असा सबंध पुरूषजातीचा सतत तक्रारीचा सूर असतो. 

Updated: Jul 30, 2018, 05:03 PM IST
मुलींच्या मनातलं ओळखायला मदत करतील 'या' टीप्स  title=

मुंबई : मुलींच्या मनातलं ओळखणं हे एक महाकठीण काम आहे असा सबंध पुरूषजातीचा सतत तक्रारीचा सूर असतो. मात्र मुलींना समजून घेणं मूळीच कठीण नाही. मुलींच्या मनात नेमकं काय चाललयं हे जाणून घ्यायचं असेल तर या गोष्टी नक्कीच तुम्हांला मदत करतील. मुलींच्या त्यांच्या साथीदाराकडून काही किमान अपेक्षा असतात. त्या पूर्ण झाल्यास रिलेशनशीपमध्ये मुलींना समजून घेणं अवघड नाही.  

एकानिष्ठ - 

साथीदार कसाही असला तरीही तो किमान आपल्याशी एकानिष्ठ असावा असं मुलींना वाटतं.  नात्यामध्येमध्ये खोट न आणता आयुष्यभर त्यांची साथ देण्यासाठी एकत्र रहावं ही इच्छा असते.  

साधेपणा - 

काही अपवाद वगळता मुलींना त्यांचा साथीदार साधेपणाला किंमत देणारा असावा असे वाटतं. पण साधा म्हणजे भोळा नव्हे. स्वभावाने साधा म्हणजे कपटी, वाईट सवयी नसणारा असावा. शांत आणि रोमॅन्टिक स्वभावाच्या मुलांसोबत राहणं त्यांना अधिक आवडत. 

क्वॅलिटी टाईम - 

प्रत्येक मुलीची अशी इच्छा असते की तिचा साथीदारासोबत तिला चांगला आणि क्वॅलिटी टाईम घालवता आला आहे. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा जोडप्यांना एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. 

खोटं बोलू नका -

नात्याचा आधार खोट्या बोलण्यावर अवलंबून असेल तर तो फार काळ टिकू शकत नाही. नात्यामध्ये किमान महत्त्वाच्या गोष्टींबाबत खोटं बोलू नका. समोरासमोर बसून सार्‍या गोष्टी बोलून स्पष्ट करा. या '5' गोष्टींंबददल खोट बोलूनही नातं मजबुत होतं