या '4' पर्यायांनी उन्हाळ्यात फ्रीजचा वापर न करताही पाणी थंड ठेवू शकाल !

उन्हाळा सुरू झाला की सहाजिकच शरीरात  उष्णता वाढते. मग थंडावा निर्माण करण्यासाठी अनेकांना थंडगार पाणी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याचा मोह होतो. पण फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी थेट पिणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.  

Dipali Nevarekar | Updated: Apr 6, 2018, 03:46 PM IST
या '4' पर्यायांनी उन्हाळ्यात फ्रीजचा वापर न करताही पाणी थंड ठेवू शकाल !  title=

 मुंबई : उन्हाळा सुरू झाला की सहाजिकच शरीरात  उष्णता वाढते. मग थंडावा निर्माण करण्यासाठी अनेकांना थंडगार पाणी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याचा मोह होतो. पण फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी थेट पिणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.  

 थंड पाणी पिण्याचे धोके  

 फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी थेट प्यायल्यास आरोग्याला त्रासदायक ठरते. सर्दी खोकल्याचा त्रास बळावतो. घशामध्ये खवखव जाणवते. शरीराच्या तापमानामध्ये अचानक बदल होणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.  

 उन्हाळ्यात शरीराला कूल कसे ठेवाल? 

 शरीरात उष्णता कमी करण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग आहेत. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो तसेच हे आरोग्यदायी पर्याय असल्याने शरीराला त्रास होत नाही. 

 माठ - 

माठाचा वापर हा ग्रामीण भागात वर्षानुवर्ष केला जातो. माठात पाणी साठवल्याने ते नैसर्गिकरित्या थंडगार राहते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसात माठात पाणी साठवून ठेवा. 

वाळा - 

वाळा ही आयुर्वेदीक वनस्पती आहे. त्याचा वापर हमखास आयुर्वेदीक औषधामध्येही केला जातो. माठात पाणी साठताना त्यामध्ये तळाशी वाळाची जुडी ठेवा. यामुळे पाणी थंडगार आणि सुवासिक राहते. वाढत्या उन्हाळ्यात 'कूल' राहण्यासाठी असा करा 'वाळ्या'चा वापर

सब्जा - 

उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडगार ठेवण्यासाठी सब्जा फायदेशीर ठरतो. पाण्यामध्ये सब्जा भिजवून ठेवा. उन्हाळ्याच्या दिवसात नियमित पाणी पितानाही त्यामध्ये सब्जा भिजवून ठेवा. 

मातीच्या बाटल्या - 

शहरी भागात आणि प्रवासात फिरताना थंडगार पाणी मिळावे म्हणून विकतचे पाणी घेणे हे खर्चिक आणि आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच मातीच्या बाटल्या विकत घेऊ शकता. माठाप्रमाणेच या बाटल्या पाणी थंड ठेवायला मदत करतात.