Kidney Healthcare tips : आपलं मानवी शरीर आणि त्यातील प्रत्येक अवयवाच स्वतःच असं महत्व आहे. एक जरी अवयव निखळला किंवा खराब झाला तर, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि तो गंभीर सुद्धा होऊ शकतो.
किडनी (kidney) आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. रक्तातील नको असलेले घटक बाहेर टाकण्यापासून ते पाण्याची पातळी योग्य राहण्यापर्यंतच महत्त्वाची काम किडनीद्वारे केली जातात. दर दिवसाला या अवयवाच्या माध्यमातून 180 मिली रक्त फिल्टर केलं जातं तर 800 मिली नको असलेले घटक आणि पाणी बाहेर टाकण्यात येतं. त्यामुळे किडनीचं आरोग्य चांगलं ठेवणं फार गरजेचं आहे. (how to keep kidney healthy)
ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेह यासांरख्या आजारांचा त्रास असतो त्या व्यक्तींना किडनीचे गंभीर आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे किडनीचं कार्य सुरळीत सुरु ठेवण्यासाठी किडनीच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी खाली दिलेल्या पाच टीप्स वापर करा. (how to keep kidney life healthy to live long follow this tips in marathi )
भरपूर पाणी प्या
किडनीचं कार्य उत्तम राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. डिहाड्रेशनचा धोका टाळण्यासाठी 70 किलोच्या व्यक्तीने दिवसाला 2500 मिली पाणी प्यायलं पाहिजे. जर तुमच्या लघवीचा रंग फिक्कट पिवळा असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित आहात. मात्र जर लघवीचा रंग गडद असेल तर तुम्हाला पिण्याच्या पाण्याचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. (drinking water benefits)
स्वतःची नियमित तपासणी करा
अहवालानुसार, भारतात मधुमेह (diabetes) आणि उच्च रक्तदाब (high blood pressure) असलेल्या रूग्णांना 40-60 टक्के किडनीच्या आजारांचा धोका असतो. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबियांमध्ये या आजारांचा त्रास असेल तर तुमची नियमितपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी.
चांगला आहार घ्या
चांगला आणि समतोल आहार म्हणजेच योग्य प्रमाणात व्हिटॅमीन्स (vitamins) आणि मिनरल्स (minerals) मिळाल्याने अवयवांचं कार्य उत्तम राहतं. कोणत्याही एका खाद्यपदार्थामधून पोषण घटक मिळत नाही त्यामुळे परिपूर्ण आहार घ्या. आहार घेताना देखील योग्य प्रमाणात घ्या. अतिप्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवण्यासाठी व्यायाम देखील करा.
स्वतः औषधं घेऊ नका
डॉक्टरांच्या सल्ल्याविना पेनकिलर घेणं टाळावं. सांधेदुखी आणि सूज येणं यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषधं घेतल्यास त्याचा किडनीवर परिणाम होतो.
धुम्रपान करणं सोडा
धुम्रपानामुळे (smoking injourious to health) रक्तवाहिन्या डॅमेज होऊ शकतात ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या ओढावण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब हे किडनी निकामी (high blood pressure causes kidney failure) होण्याचं प्रमुख कारण मानलं जातं. त्यामुळे ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो त्यांनी त्यांच्या डॉक्टरांशी बोलून घ्यावं.
(टीप : वरील माहिती माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे, झी २४ तास याची खातरजमा करत नाही )