मुंबई : तंबाखूचं सेवन आरोग्याला धोकादायक आहे. तंबाखू अनेक स्वरूपामध्ये बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये गुटखा, सुपारीपासून केमिकलयुक्त सुपारीचा समावेश आहे.
तंबाखूच्या सेवनामुळे कॅन्सरचा धोका बळावतो. तोंडाचा कॅन्सर होण्यामागे तंबाखू हे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे आरोग्याला हानीकारक असणार्या या व्यसनातून मुक्तता मिळवणं गरजेचे आहे. तंबाखूचं व्यसन सोडण्याची इच्छा अनेकांना असते मात्र नशेच्या गर्तेमध्ये अडकलेल्यांना हे सोडवणं कठीण होऊ न बसतं. डॉक्टर अनेकदा त्यासाठी महागडे उपचार सुचवतात. तंबाखू प्रोडक्सच्या पाकिटावर दिसणार काऊंन्सलरचा टोल फ्री नंबर
तंबाखू सोडण्यासाठी अनेक घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. प्रामुख्याने तुम्हांला इच्छाशक्तीची गरज असते. जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तंबाखूच्या व्यसनापासून दूर जाऊ शकता.
तंबाखूचं व्यसन सोडायचं असेल तर ओव्यासोबत लिंबाचा रस मिसळून त्यामध्ये काळं मीठ मिसळा. हे मिश्रण दोन दिवस ठेवल्यानंतर जेव्हा तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा हे मिश्रण खावे.
बडीशेपाची भरड आणि खडीसाखरेचे मिश्रण बनवा. हे मिश्रण हळूहळू चघळा. यामुळे तंबाखू खाण्याच्या इच्छेवर मात करणं सुकर होते.
तंबाखू खाल्ल्याने कॅन्सरचा धोका असतो सोबतच दात कमजोर होतात, त्यावर काळे डाग पडतात. या घरगुती उपायांनी दातांवरील काळे डाग होतील दूर ...