Alcohol Odor Removal: दारु प्यायल्यानंतर येते तोंडाची दुर्गंधी? हे उपाय नक्की ट्राय करा!

Alcohol Odor On Breath: दारु पिल्यानंतर जर तुमच्या तोंडाचा वास घालवायचा (Alcohol Odor Removal) असेल तर माऊथ फ्रेशनर (Mouth Freshener) उत्तम पर्याय आहे. जर ऐनवेळी...

Updated: Dec 31, 2022, 05:46 PM IST
Alcohol Odor Removal: दारु प्यायल्यानंतर येते तोंडाची दुर्गंधी? हे उपाय नक्की ट्राय करा! title=
alcohol odor 31st Party

Alcohol Odor Removal: आज सर्वत्र थर्टी फर्स्ट (Thirty First) जल्लोषात साजरा केला जातोय. सगळीकडे पार्टीचं (31st Party) वातावरण दिसतंय. थर्टी फर्स्ट म्हटलं की मित्रमंडळी आणि पार्टी-शार्टी आलीच... अन् थोडीसी ड्रिंक (Alcohol) तर सर्रास घेतली जाते. मात्र, थर्टी फर्स्टनंतर अनेकांना घरी जावं लागलं. घरी जायचं म्हटलं की तोंडाच्या वासाची (Alcohol Odor) काळजी घेणं गरजेचं. तोंडाचा वास तुम्हाला टाळता देखील येऊ शकतो, जाणून घ्या कसं... (how to get rid of alcohol odor from mouth after 31st Party read tips marathi news)

दारु पिल्यानंतर जर तुमच्या तोंडाचा वास घालवायचा (Alcohol Odor Removal) असेल तर माऊथ फ्रेशनर (Mouth Freshener) उत्तम पर्याय आहे. जर ऐनवेळी माऊथ फ्रेशनर उपलब्ध नसेल तर तुम्ही कोलगेटचा (colgate) देखील वापर करू शकता. दात घासल्यानंतर तोंडाची दुर्गंधी कमी होते. इलायची (Cardamom), बडिशेप आणि मसाले पान खाल्यानंतर तोंडाचा वास येणार नाही, त्यामुळे हा देखील चांगला पर्याय उपलब्ध आहे.

घरगुती उपायच्या (Home Remedies) बाबतीत बोलायचं झालं तर लसूण (Garlic) पाकळ्या कांदा फोड खाल्याने तोंडाचा वास कमी होईल. तसेच लिंबू सरबत (Lemon syrup) देखील उपायकारक ठरू शकतो. कपड्यावरील वास घालवण्यासाठी पॉकेट परफ्यूमचा (Pocket Perfume) वापर करू शकता. त्यामुळे सर्वांसमोर देखील तुमची इमेज खराब होणार नाही.

आणखी वाचा - Video Alcohol : व्हिस्की, वाइन, वोडका, बियर, रम यांच्यामधील अंतर माहिती आहे का?

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर तुम्ही मास्क (Mask) वापरत असाल. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होईल. रात्री मद्यपान (Alcohol Drinking) केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवल्यास तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं पेनकिलर घेऊ शकता. तसेच भरपूर पाणी (Drink Water) प्यायल्यानं डिहायड्रेशनची शक्यता कमी होते. या उपायांचा वापर करून तुम्ही न्यू ईयर (Happy New Year) जल्लोषात साजरा करू शकता.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)