'असं' खाल कीवीचं फळं तर होतील अनेक आरोग्यदायी फायदे

कीवी हे फळ आजकाल बाजारात अगदी सहज उपलब्ध होत आहे. 

Updated: Jul 8, 2018, 09:06 PM IST
'असं' खाल कीवीचं फळं तर होतील अनेक आरोग्यदायी फायदे  title=

मुंबई : कीवी हे फळ आजकाल बाजारात अगदी सहज उपलब्ध होत आहे. बटाट्याच्या आकाराचं आणि चिकूप्रमाणे दिसणारं फळ अगदी चविष्ट आहे. कीवीच्या बाहेरील आवरणावर बारीक बारीक केस असतात. यामुळे अनेकांच्या मनात त्याबाबत गैरसमज निर्माण होतात. कीवी हे फळ साल काढून किंवा सालासकटही खाल्लं जाऊ शकतं. कीवी फळाच्या सालीमध्येही अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामधील अ‍ॅसिड आरोग्याला फायदेशीर आहे. कीवीचं फळं सालीसकट खाल्ल्याने चव बिघडवू शकते मात्र आरोग्याला त्याचे अनेक फायदे आहेत. 

कीवी फळाच्या सेवनाचे फायदे  

कीवीच्या फळामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामधील अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म आतड्यांमधील घातक बॅक्टेरियांचा नाश करतात. 

कीवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक असतात. यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होते. यामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते. त्वचेची कांती सुधारते. 

कीवी फळाच्या सेवनामुळे घातक कोलेस्ट्रेरॉल घटक कमी होण्यास मदत होते. नियमित 8-10 आठवडे कीवीचे सेवन केल्यास कोलेस्ट्रेरॉलमुळे होणारा त्रास कमी होतो. 

रक्तदाबाचा त्रास नियंत्रणामध्ये ठेवण्यास कीवीचे फळ मदत करते. यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

कीवीमध्ये आयर्न घटक मुबलक असल्याने रक्ताची कमतरता, आयर्नचे प्रमाण सुधारण्यास मदत होते. 

बिघडलेले पचनकार्य सुधारण्यास मदत होते. कीवीमधील एक्टिनिडिन एन्झाईम्स पचनसंस्थेला चालना देते.