कसा होतो ब्रेन ट्यूमर, १० ते १५ महिन्यात होतो व्यक्तीचा मृत्यू

जर वेळेवर ब्रेन ट्यूमरची माहिती झाली तर योग्य प्रकारे उपचार करुन व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. जर योग्य वेळी उपचार नाही मिळाले तर १५ ते २० महिन्यात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 11, 2018, 03:22 PM IST
कसा होतो ब्रेन ट्यूमर, १० ते १५ महिन्यात होतो व्यक्तीचा मृत्यू title=

मुंबई : जर वेळेवर ब्रेन ट्यूमरची माहिती झाली तर योग्य प्रकारे उपचार करुन व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. जर योग्य वेळी उपचार नाही मिळाले तर १५ ते २० महिन्यात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

बॉलिवूड अभिनेता इरफान खानने सोशल मीडियावर आपल्या फॅन्सला माहिती दिली होती की तो सध्या एका आजाराशी लढतो आहे. आठवड्याभरात याचे रिपोर्ट हाती येतील असं इरफानने म्हटलं होतं. इरफानला ग्लियोब्लास्टोमा मल्टीफोर्मे (जीबीएम) ग्रेड-4 सारखा जीवघेणा ब्रेन ट्यूमर झाल्याचं बोललं जात आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

काय आहे जीबीएम? 

ग्लियोब्लास्टोमा मल्टीफॉर्म किंवा जीबीएम हा एक प्रकारचा जीवघेणा ब्रेन ट्यूमर आहे. हा ट्यूमर अधिक प्रमाणात वृद्धांमध्ये आढळतो. जीबीएम स्टारच्या आकाराच्या कोशिकांच्या लीनीऐजने होतो. ज्याला एस्ट्रोसाइट्स देखील म्हणतात. या कोशिका तंत्रिका कोशिकांना समर्थन देतात. जर या ब्रेन ट्यूमरचं माहिती लगेच झाली नाही तर १० ते १५ महिन्यात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

काय आहे कारण 

जीबीएम अनेक वेगळ्या कोशिका मिळून बनतात. याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही पण आनुवंशिक परिवर्तनामुळे हा होतो. जीबीएम मुख्य रूपात मेंदुच्या सेरिब्रल हेमिस्फेरेस भागात विकसित होतो. पण हा ब्रेनस्टेम, पाठीचा कण किंवा मेंदुच्या इतर भागात विकसित होतो.

ब्‍लड टेस्‍टमधून ओळख

ब्लड टेस्ट करुन कमीत कमी वेळेत याची माहिती मिळू शकते. याचा उपचार फक्त सर्जरीनेच होतो. याशिवाय रेडिएशन, केमोथेरेपी, कंबाइंड रेडिएशन आणि कीमोथेरेपीचा देखील उपचार केला जातो. जर सर्जरीने ट्यूमर नाही निघत तर मग रेडिएशन किंवा केमोथेरेपीचा वापर केला जातो.