धकाधकीच्या जीवना कशी कराल नैराश्यावर मात...! आंनददायी जीवनाचा नवा मंत्र

आपण रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक गोष्टींना सामोरे जातो आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत येणाऱ्या आणि घडणाऱ्या अनेक प्रसंगाना सामोरे जावे लागते. आणि या घडणाऱ्या गोष्टीतून नैराश्या सारखी समस्या निर्माण होते. अश्याच नैराश्याला तुम्ही कशा प्रकारे दुर कराल यांच्या खास टीप आपण पाहुया  

Updated: Jun 7, 2022, 05:09 PM IST
धकाधकीच्या जीवना कशी कराल नैराश्यावर मात...! आंनददायी जीवनाचा नवा मंत्र  title=

मुंबई - रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेकदा नैराश्याला सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम आपल्या सामाजिक आणि रोजच्या आयुष्यावर परिणाम करतो. सध्याचे आयुष्य हे खुप फास्ट आणि टेक्नोलॉजी सोबत पुढे जात असल्याने आपले आयुष्य सु्द्धा त्याच गतीने चालत असते. आपण रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक गोष्टींना सामोरे जातो आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत येणाऱ्या आणि घडणाऱ्या अनेक प्रसंगाना सामोरे जावे लागते. आणि या घडणाऱ्या गोष्टीतून नैराश्या सारखी समस्या निर्माण होते. अश्याच नैराश्याला तुम्ही कशा प्रकारे दुर कराल यांच्या खास टीप आपण पाहुया
 
नैराश्याला दूर करण्यासाठी पुढील गोष्टी करा 
सकाळी लवकर उठणे आणि व्यायाम करणे सकाळी उठल्याने मन प्रसन्न राहते.सकाळी लवकर उठुन बाहेर ऊर्जात्मक हवा म्हणजेच ऑक्सिजन आत्मसात केल्याने थोडाफार नैराश्या जाण्यास मदत होते. दिवसांची सुरुवात करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा व उत्साह मिळतो.  

नैश्यात आरोग्याची तितकचं काळजी घेण गरजेचे आहे. खाण्यापिण्याच्या गोष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे. फळ आणि हिरव्या पालेभाज्या खाल्याने आरोग्य चांगले राहते आणि शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आहारात फास्ट - फूडचा वापर टाळावा, मद्यापान यासारख्या गोष्टी करु नये.

नैराश्य आल्यावर भुकं न लागणे , जेवण न जाणे यासारख्या गोष्टी होतात यासाठी वेळवर जेवणाची सवय ठेवणे गरजेचे आहे. वेळत जेवल्यास चिडचिड होणे कमी होते. तसेच आपल्या ज्या गोष्टीतून आपल्या मानिसक समाधान आणि नैराश्य दुर होण्यास मदत होईल अशा गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. योगा, प्राणायाम आणि ध्यान या गोष्टी केल्याने मानसिक समाधान मिळण्यास मदत होते. आध्यात्मिक गोष्टी देखील तितक्याच सकारत्मक विचार करण्यास उपयोगी ठरतात.